आज ७ जुन जागतिक पोहे दिन आहे. असा दिवस असतो हे मला माहित नव्हतं. पण खरंच आहे.

पोहे माझ्या अतिशय आवडीचे कधीही खाऊ शकते. कांदे पोहे, बटाटा पोहे, दडपे पोहे लावलेले पोहे, कोळांचे पोहे, मटार पोहे, वांगेपोहे, दुधपोहे, दहीपोहे, कोकणातील गुळ खोबरं घातलेले पोहे असे कितीतरी प्रकार. ओलं खोबरं, कोंथिबीर, लिंबु, शेंगदाणे, शेव, पोह्याचा पापड, लोणचं, खारांची मिरची पोहे जितके नटवु तितके नटतात. गोपाळकालाची चव तर अद्वितीय. पूर्वी लग्न ठरवताना कांदे पोहे अगदी महत्त्वाचे. पोहे हा कमी साहित्यात ,आणि कमी वेळात होणारा पोटभरीचा चविष्ट पदार्थ.

मला पातळपोहे त्यांत तेल,तिखटमिठ, थोडे मेतकूट आणि लिंबू असले तर भाजलेले शेंगदाणे असे झटपट केलेले पोहे खुप आवडतात. कैरीचे लोणच्यांच्या खारात पोहे मिक्स करून खा अगदी जबरदस्त.

आम्ही इंदोरला गेलो होतो तिथले जिरावण घातलेले वाफेवरचे पोहे तर एकदम भन्नाट. कोकणात सुध्दा फिरताना अतिशय चविष्ट पोहे मिळतात. नागपुरी तरीपोहे तर छणछणीत.

कृष्ण आणि सुदामा ह्यांच्या उदात्त मैत्रीचे प्रतिक असलेले “पोहे”

तुम्हांला आवडतात का पोहे? कुठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *