
वसई: वयात येणाऱ्या मुला मुलींचे भावविश्व ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. अभ्यास आणि करियर करत असताना मनात रुजणाऱ्या लैगिक भावना, भोवतालचे संभाव्य धोके आदीपासून मुलांना चांगल्या वाईटाची जाणीव करुन देतांना पालकांची कसोटी लागते. यासाठी आता जाणीव संस्थेने पालाकंसाठी विनामूल्य व्याख्यान आयोजित कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांची जबाबदारी काय, मुलांच्या लैंगिक भावनाचे कसे हाताळायचे, त्यांचा मानसिक कोंडमारा कसा दूर करायचा, या वयात उद्भवणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या आदी विषयावर जाणीव चे समन्वयक मिलिंद पोंक्षे हे विनामूल्य व्याख्यान देणार आहे.
वयात येणाऱ्या किशोरवयीन मुला मुलींमध्ये वाढत्या वयाबरोबर अनेक शारिरीक आणि मानसिक बदल होत असतात. एकीकडे करियर, अभ्यास सुरू असताना प्रेमभावना फुलत असते. मनात लैंगिकतेचे आर्कषण निर्माण होते आणि मनात मानसिक द्ंवद सुरू होते. कोवळ्या वयात मानसिक आणि भावनिक कोंडमारा होतो. बऱ्याचदा त्याचा गैरफायदा घेतला जातो. अशा वेळी पालकांची भूमिका महत्वाची असते. मुलांचे भावविश्व समजून घेताना त्यांच्या लैंगिक आंकर्षणाला काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगून त्यांना आपुलकीने मार्गदर्शन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. समाजातील संभाव्य धोके सांगून त्यांना सक्षम करणे, त्यांना योग्य मार्ग दाखवणे, चांगल्या वाईटाची जाणीव करून देणे हे पालकांचेच काम आहे. अशावेळी पालकांनी काय करावे, मुलांशी संवाद कसा साधावा, त्यांच्या लैंगिक आणि भावनिक जाणीवा कशा हाताळाव्यात, कुठले कुठले धोके उद्भवू शकतात आदींवर मार्गदर्शन करण्यासाठी जाणीव संस्थेने आता पालकांची कार्यशाळा आयोजित कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे. जाणीव संस्थेचे समन्वयक मिलिंद पोंक्षे पालकांसाठी व्याख्यान आयोजित कऱणार आहेत. हे व्याख्यान विनामूल्य असून ज्यांना आपापल्या विभागात असे व्याख्यान ठेवायचे असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा