श्री.संजय जगताप, नगर अभियंता (बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महानगरपालिका) हे वसई-विरार शहर महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषद सध्या वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरात श्री.संजय जगताप, नगर अभियंता यांनी ५ वर्षाच्या जास्त काळ हे नगर अभियंता म्हणून कार्यरत होते. दि.०३ जुलै २००९ रोजी शासनाने वसई/नालासोपारा/विरार/नवघर-माणिकपूर नगरपरिषदा व तालुक्यातील काही गावांची संख्या मिळून वसई-विरार शहर महानगरपालिका शासनाने स्थापना केल्यापासून आजतागायत म्हणजे (दि.०३ जुलै २००९ ते दि.०३ जुलै २०१९) नवघर-माणिकपुर 4 नगरपरिषद ५ वर्ष, वसई-विरार शहर महानगरपालिका १० वर्ष असे एकूण १५ वर्ष नगर अभियंता म्हणून प्रतिनियुक्तीवर शासनामार्फत सेवा देत आहेत.

श्री.संजय जगताप, नगर अभियंता हे गेल्या ३ वर्षांपेक्षा जास्त कालखंड बेकायदेशीररित्या प्रभारी उपसंचालक, नगररचना, वसई-विरार शहर महानगरपालिका या पदावर कार्यरत आहेत. वास्तविक पाहता श्री.संजय जगताप हे १५ वर्ष एकाच ठिकाणी प्रतिनियुक्तीव्दारे म्हणजेच शासकीय अधिका-यावर विविध लोकप्रतिनिधींकडून दबाव आणून, स्थानिक आमदार हितेंद्र विष्णू ठाकूर दि.२१ व २२/०५/२०१७ चे पत्र व वसई-विरार शहर महानगरपालिका यांचे दि.२४/०५/२०१७ चे पत्राच्या शिफारशीमुळे नगरविकास विभाग, ४ था मजला, मंत्रालय, मुंबई-३२ यांचे क्र.: वविम-१९१७/प्र.क्र. २५२/नवि २३, दि.३१ ऑगस्ट २०१७ अन्वये १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतवाढ दि.०१ सप्टेंबर २०१८ रोजी संपुष्टात आलेली असतानादेखील श्री.संजय जगताप, शहर अभियंता हे बेकायदेशीररित्या वसई-विरार शहर महानगरपालिकेत नगररचना विभागात प्रभारी उपसंचालक पदावर आजही काम करीत आहेत.

श्री.संजय जगताप, नगर अभियंता (बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महानगरपालिका) यांची पार्श्वभूमीही अत्यंत संशयास्पद आहे. तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषद सध्याचे वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये होणारे अनधिकृत
बांधकाम, CRZ, वेटलैंड, मिठागरे, बांधकाम घोटाळे, उदा.४ मजली बिल्डींग परवानगी असताना
७ किंवा १४ मजल्याच्या बेकायदेशीर इमारती बनवण्यात आलेल्या हजारो बांधकाम परवान्याच्या
नेमक्या त्याच फाईली वसई-विरार शहर महानगरपालिकेतून गहाळ झालेल्या आहेत.

गाव मौजे-आचोळे येथील –
स.नं. हि.नं. क्षेत्र आकार
नविन १५० पै. हे.आर. रू. पै.
जुना ११० -०-३०-६ ५-६९

वरील प्रमाणे वर्णन असलेली ३० गुंठा जमीन माझे वडील स्वर्गीय सुरेश नरसिंह दुबे यांनी दि.०१/११/१९८५ रोजी ईनाम फर्नाडीस नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती. मात्र
उपसंचालक नगररचना वसई-विरार शहर महानगरपालिका यांनी लेआऊट नं.०३, सर्वे नं.जुना
११०, नविन (१) १५०, प्लॉट नं.१, (२) १५०, १५१, प्लॉट नं.०२, सर्वे न.१७२, १७६, १२१ पार्ट, १५० प्लॉट नं.३ एवं-१५० हिस्सा नं.१/२ मौजे -आचोळे वर मे.साई सिध्दि बिल्डर एवं विकासक याच्या नावाने सीसी दिली आहे. यासंदर्भात भाई ठाकूर व त्याच्या टोळीतील गुंडांनी बनावट बोगस कागदपत्र बनवून अनधिकृत इमारती तयार करण्याचा मानस आहे. मे.साई सिध्दि बिल्डर एवं विकासकास सीसी देण्यात येऊ नये म्हणून मा.आयुक्त वसई-विरार शहर महानगरपालिका व मा.पोलीस निरीक्षक तुळींज पोलीस ठाणे यांना दि.०८/०२/२०१६ रोजी व मा.तहसिलदार वसई यांना दि.०९/०२/२०१६ रोजी दिलेल्या पत्राव्दारे तक्रार केलेली आहे. या जागेसंदर्भात १९९२ मध्ये गुन्हा दाखल आहे व बसई कोर्टात सूट क्र.६२/१० आहे. तरी सुध्दा वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून बेकायदेशीररित्या बांधकाम परवानगी दिलेली आहे. प्रत्यक्षात बांधकामही सुरू आहे.

श्री.संजय जगताप, नगर अभियंता यांच्या कार्यकाळात शहरातील राखीव जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या जमिनी बळकावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. वन, आदिवासी, CRZ, वेटलैंड, मिठागरे या जागेवर बेकायदेशीर बांधकामे श्री.संजय जगताप, नगर अभियंता यांच्या संपुर्ण संरक्षणाखाली झाले आहेत. उदा.गोगटे सॉल्ट प्लॅन, सनसिटी, वसई पश्चिम सनसिटी-गास रस्ता येथे सीआरझेड (CRZ) १, वेटलैंड जमिन सर्वे क्र.१७६ ए & १७७ मध्ये कोणतीच परवानगी न घेता ११ कोटी रूपये दफनभूमीचे काम करण्यात आले आहे. तसेच तहसिल वसई यांनी ४ कोटी ७५ लाख रूपये दंडाची नोटीस ठोठावली आहे. सदर बेकायदेशीर दफनभूमीचे बांधकाम पाडण्याचे आदेश नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) दिले होते तसेच महापालिकेने सीआरझेड (CRZ) १ मधील सदरचे बेकायदा बांधकाम पाडले आहे. वसई-विरार शहराच्या लोकांच्या कराच्या पैशांच्या ११ कोटी (११,००,०००,००/-) रूपयांची नासाडी केली. यास सर्वस्व जबाबदार श्री.संजय जगताप, नगर अभियंता हे आहेत.

श्री.संजय जगताप, नगर अभियंता (बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महानगरपालिका) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात केलेल्या चुकीच्या, कुचकामी व नियोजित शुन्य कामामुळेच गेल्या वर्षी जुलै महिन्यात वसई-विरार उपप्रदेश ७ दिवस पाण्याखाली बुडालेला होता. तसेच वसई-विरार शहर पूर्व पदावर येण्यासाठी १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस लागले होते. यात ६ मृत्यु झाले होते. गेल्या दोनच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वसई-विरार संपूर्ण शहर हे पुन्हा पाण्याखाली बुडले होते. ४ लोकांचा मृत्यू झाला. संपूर्ण रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे.

तत्कालीन आयुक्त श्री.सतीषजी लोखंडे यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. पुरामुळे वीजपुरवठा खंडीत झाला, संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तसेच शहरातील अनेक भागांत पाणी जाऊन कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. त्यासाठी वसई-विरार शहर महापालिकेने १२ कोटी रूपये खर्च करून IIT-Bombay & NEERI कडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाहणी सूचना मागवल्या होत्या. त्यात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IT-Bombay) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संसोधन संस्था (NEERI) पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र (CESE), पर्यावरण संशोधन आणि शिक्षण केंद्र (CERE) प्रतिनिधी, तज्ञांचा व आदींचा समावेश होता. दि. १८ जानेवारी २०१९ व दि.०७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत या समितीने विविध प्रभाग समितीत हजर राहून जनसुनावणी घेतली होती. समितीचा पहिला अहवाल वसई-विरार शहर महानगरपालिकेला सादर करण्यात आला होता.

वसई-विरार शहर महानगरपालिकेला सादर करण्यात आलेल्या पहिल्या अहवालानुसार नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतून जाते, त्या सोपारा खाडीचा मार्ग वसई शहरात आल्यानंतर त्याठिकाणी कृष्ण टाऊनशिप येथे खाडीचा मार्ग बदलून तिथे खाडीत भराव करून मैदान तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. सत्यशोधन समितीच्या अहवालात पान क्रमांक २१ व २२ मध्ये हा जो बदलेला मार्ग आहे तो पूर परिस्थितीला आमंत्रण देणारे आहे. असे अनेक कारणे हे नमूद केले आहे आणि २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी तो पाणी जाण्यासाठी पूर्ववत करावा अशी सूचना असतांनादेखील महानगरपालिका झोपेच सोंग घेतले होते. खाडीचा हा मार्ग महानगरपालिकेनेच भराव टाकून बंद केला आणि तिथे (सनसिटी (गोगटे सॉल्ट प्लॅन) अनधिकृत मैदान तयार केले आहे. किंबहुना महानगरपालिकेने शहरात गाळ काढण्याचे कामही पूर्णपणे केले नसून तो काढून तिथेच ठेऊन पुढच्या वर्षासाठी ठेकेदारांची आर्थिक सोय करून ठेवली आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाने येणाऱ्या पूराची वाट पाहत होती.

IIT-Bombay & NEERI ने दिलेल्या अहवालावर कार्यवाही न करणाऱ्या व कामात कुचराई केल्यामुळे अकार्यक्षम अधिकारी श्री.संजय जगताप, नगर अभियंता (बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महानगरपालिका) यांनी या अहवालावर कोणतीच कार्यवाही न केल्याने पुन्हा वसई-विरार शहर बुडाले आहे. आज दि.०३ जुलै २०१९ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या स्थापनेस १० वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा हाच अकार्यक्षम अधिकारी बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महापालिका या पदावर काम करीत आहे.हे वसई-विरारकरांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

श्री.संजय जगताप, नगर अभियंता बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई विरार शहर महानगरपालिका यांचे विकासक व भूमाफिया यांच्याबरोबर लागेबंधीचे संबंध असल्यामुळे त्यांना वसई-विरार शहर महानगरपालिका सोडवित नाही.

श्री.संजय जगताप, नगर अभियंता (बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महानगरपालिका), त्यांचे जवळचे नातेवाईक व वसई-विरार शहर महानगरपालिका नगररचना विभागात काम करणारे त्यांचे सहकारी ठेका अभियंता अमित राऊत, रूद्रेश व इतर अधिकारी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडे असणारे स्वतःचे मोबाईल व इतर लोकांच्या नावाने वापरत असणारे मोबाईल फोनची CID मार्फत चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात भूमाफीया व महापालिकेचे राखीव जमिनी बळकावणाऱ्या लोकांची नावे बाहेर येऊ शकतील.

वसई-विरार शहर महानगरपालिका नगररचना विभागात देण्यात आलेले बनावट परवाने, अनधिकृत बांधकामे, CRZ, वने, आदिवासी, वेटलैंड, मिठागरे व महापालिकेच्या राखीव जागेवर झालेले बांधकाम घोटाळे व भूमाफीयांबरोबर असलेले श्री.संजय जगताप व वसई-विरार शहर महानगरपालिका नगररचना विभागात काम करणारे त्यांचे सहकारी ठेका अभियंता अमित राऊत, रूद्रेश व इतर अधिकारी यांचे लागेबंधीचे संबंध असल्याची स्पष्टता निदर्शनास येईल. श्री.संजय जगताप, नगर अभियंता (बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महानगरपालिका) यांना त्वरीत नगर अभियंता वसई-विरार शहर महानगरपालिका या पदावरून हटवून त्यांची CID मार्फत विभागीय चौकशी करण्याचे आदेश होण्यास विनंती केली होती.

दि.२५/०७/२०१९ रोजीच्या पत्रान्वये श्री.संजय जगताप यांची शैक्षणिक पात्रता फक्त ( Diploma in Civil Engineer) आहे. वास्तविक पाहता महानगरपालिका उपसंचालक नगररचना या पदासाठी कमीतकमी ME Tech Engineering (Planning), सदस्य, भारतीय नगररचना प्राधिकरण, दिल्ली (Membership Institute of Town Planners, India, Delhi) तसेच नगररचनाकार म्हणून काम केल्याचा १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असतानाही स्थानिक महानगरपालिकेतील सत्ताधारी, तत्कालीन आयुक्त श्री.सतीष लोखंडे व सध्याचे कार्यरत असणारे आयुक्त श्री.बी.जी.पवार यांच्या संरक्षणामुळेच श्री.संजय जगताप नाममात्र Diploma in Civil Engineer असतानाही बिनकतपणे बेकायदेशीररीत्या उपसंचालक नगररचना या पदावर चिटकून होते. मा.मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्या पत्राची दखल घेऊन नगरपरिषद प्रशासन संचालनालय क्र.नपप्रस/कक्ष-५/संवर्ग/संजय जगताप/बदली/प्र.क्र.-/२०१९/२२९५, दि.०५/०८/२०१९ रोजी बदली करून दि.०५/०८/२०१९ पासून त्यांना वसई-विरार शहर महानगरपालिकेतून कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी संजय जगताप यांनी स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर व महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून दडपण/दबाव आणून यापूर्वी आपली बदली थांबवली होती. सदर आदेशामध्ये बदली रद्द करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे बदली रद्द करण्याबाबत दडपण/दबाव आणल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियम, २३ नुसार शिस्तभंगाची कारवाई होईल असे बदली आदेशात म्हटले आहे. अखेर वसई-विरारच्या जनतेची मा.मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बेकायदेशीर उपसंचालकाकडून मुक्तता केलेली आहे. संजय जगताप यांच्या बेकायदेशीर उपसंचालक नगररचना यांच्या कार्यकाळात देण्यात आलेले बांधकाम व इतर परवानगीवर राज्य सरकारने CID मार्फत विभागीय चौकशीची मागणी कायम ठेवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *