
प्रतिनिधी :वसई तालुक्यात भूमिगत ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम जिओ डिजिटल फायबर प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले होते. मात्र वसई विरार शहर महानगरपालिकेने सदरचा ठेका रद्द केल्यानंतरही बेकायदेशीरपणे काम चालू असल्याची बाब उघडकीस आली आहे. तरी सदर प्रकरणी प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात भूमिगत ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचा ठेका मे. जिओ डिजिटल फायबर प्रा. लि. या कंपनीला देण्यात आलेला होता. दि. २८/३/२०२० रोजीच्या आदेशाने सदर ठेका देण्यात आला होता. मात्र दि. ९/१२/२०२१ रोजी हा ठेका रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. कोणताही ठेका देताना त्यामध्ये अटी व शर्ती असतात. सदर कंपनीने अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास ठेका रद्द केला जातो. अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे महानगरपालिकेने सदर कंपनीचा ठेका रद्द केला. विशेष म्हणजे ठेका रद्द केल्यानंतर ही कंपनीने काम चालूच ठेवले.
वसई विरार शहर महानगरपालिकेने ठेका रद्द केल्यानंतर दि. ५/१/२०२२ रोजी पालघर जिल्हा परिषदेकडून सदर कंपनीने ठेका मिळवून काम चालू केले. वसई विरार शहर महानगरपालिकेने जो ठेका रद्द केला त्याच कामाचा ठेका सदर कंपनीने पालघर जिल्हा परिषदेकडून मिळविला….पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ठेका रद्द करावा.