
पालघर : जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे , पुरपरिस्थीती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू देवू नका असेही त्यांनी सांगीतले.

नदी व खाडी किनाऱ्यावर नव्याने कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी व संबधित विभागाने दर महिन्याला त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा आढावा घेवुन अहवाल वरिष्ठांना अहवाल सादर करावा.
वसई नालासोपारा भागात वारंवार रस्ता पाण्याखाली जात असल्याने त्यासंबधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.तसेच कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, महानागरपालिका व नगरपरिषद या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत सविस्तर चर्चा केली.
लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांची शक्यता लक्षात घेवून आरोग्य विभागाने औषधांचे वाटप करावे, पुरपरिस्थितीमध्ये नुकसान झालेल्यांचे पंचनामे तात्काळ करून त्यांना शासनाची सर्वतोपरी मदत तात्काळ दयावी, असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी पुरपरस्थितीमध्ये संबधित विभागाने करावयाच्या उपायायोजना बाबत निर्देश दिले