पालघर दि. 02 : ग्रामिण भागातील रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजीव जाधवर, ग्रामिण फस्ट डेव्हलपमेंट फांऊडेशनच्या थाईझा डायस, श्री. जेकब, श्री. केनेथ, श्रीमती नेटली, श्री आसरथ आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचणे अडचणीचे होऊ नये यासाठी ग्रामिण फस्ट डेव्हलपमेंट फांऊडेशन या संसथेने जिल्हा प्रशासनाला रुग्ण वाहिका दिली आहे. सदर रुग्णवाहिका मोखाडा येथील ग्रामिण रुग्णालयात सेवा देणार आहे. या रुग्णवाहिकामुळे दुर्गम भागातील नागरिकांना तसेच मोखाडा तालुक्यातील गाव, पाडे भागातील ग्रामस्थांना मोठा आधार मिळणार आहे.