

जिल्हाधिकारी कार्यालयामधील पहिला पत्रकार कक्ष
जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
पालघर दि. 21 : जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे दालन मिळावे या उद्देशानी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला असून हा पत्रकार कक्ष राज्यातील पहिला पत्रकार कक्ष आहे जो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, दै. लोकमतचे जिल्हा प्रतिनीधी हितेन नाईक, दै. सकाळचे जिल्हा प्रतिनीधी पी.एम.पाटील, ए.बी.पी माझाचे जिल्हा प्रतीनीधी संतोष पाटील, दै. लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनीधी निरज राऊत, दै. महाराष्ट्र टाईम्सचे जिल्हा प्रतिनीधी नरेद्र पाटील, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनीधी सचिन जगताप, दै. नवभारतचे जिल्हा प्रतिनीधी संजय सिंह, निखिल मेस्त्री, शाम आटे, श्री. बाबरे व इतर पत्रकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्रकार कक्षाची स्थापना करण्यात आली होती. पत्रकार कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ जिल्हापरिषद, पोलीस अधिक्षक कार्यालय, तसेच जिल्हा स्तरावरील जवळपास सर्व कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने तसेच जिल्हाधिकारी कार्यालय मध्यवर्ती ठिकाण असल्याने पत्रकारांना शासकीय कार्यक्रम, बैठकीच्या बातम्या करणे सोपे होणार आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.