आज दिनांक १ मे रोजी जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या शुभहस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती प्रतिभा गुरोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून मांवनदना देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी महाराष्ट्र दिन,
कामगार दिन आणि
जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या स्थापनेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *