
जिल्हा परिषद पालघर येथे आज दिनांक १५/११/२०२२ रोजी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, रवींद्र शिंदे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जननायक बिरसा मुंडा याचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. ते एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. १९ व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींद्वारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते.
अशा थोर पुरुषाची जयंती आज जिल्हा परिषद येथे साजरी करण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) चंद्रशेखर जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) प्रवीण भावसार, कार्यकारी अभियंता (पा पु ) गंगाधर निवडुंगे, शिक्षणाधिकारी संगीता भागवत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.