आज दिनांक 23/3/2024 रोजी संत गाडगेबाबा  ग्रामस्वच्छता अभियान सन 2023-2024 अंतर्गत वाडा तालुक्यातील  खनिवली ग्रामपंचायतींची  तपासणी जिल्हा स्तरीय समिती मार्फत करण्यात आली.
यावेळी पालघर जिल्हा परिषदचे  मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे चंद्रशेखर जगताप  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रवीण भावसार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास,पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली.

यावेळी वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, गावातील वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोष खड्डे, लीचपिट , घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, अंगणवाडी, शाळा व आरोग्य केंद्र  येथील स्वच्छतेच्या सुविधा व  परिसर स्वच्छता इ.पाहणी केली,  तसेच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेली  पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली.

यावेळी वाडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.आर. कोळी भगवान मोकाशी गट शिक्षण अधिकारी, अस्मिता बिर्जेमॅडम, सी. डी . पी. ओ. विस्तार अधिकारी वसंत अहिरे, सरपंच भरत हजारे, ग्रामस्थ,  उपसरपंच,ग्रामसेवक  ग्रामपंचायत कर्मचारी,सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *