पालघर, :- राज्य शासनाला दोनवर्षे पुर्ण झाल्या निमित्त शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत तिन संस्थांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात पथनाट्याद्वारे लोककलावंतांनी यशस्वी सादरीकरण करून जनतेमध्ये शासकीय योजना विषयी जनजागृती केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती कला मंच, सिद्धी विनायक संस्था, माय नाटक कंपनी या संस्थेने जिल्ह्यात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली. लोक कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जनजागृती कलामंच यांनी पालघर तालुक्यातील बेटेगाव, सफाळे, चावडे, पालघर आणि सिद्धी विनायक संस्था यांनी वाडा तालुक्यातील निघसे, खैरे, आंबिवली, तुसे तसेच माय नाटक कंपनी या लोककला पथकांनी वसई तालुक्यातील चंदनसार बाजार, मांडवी बाजार(ग्रामीण), वालीव बाजार येथे यशस्वीरीत्या पथनाट्याद्वारे शासकीय योजना, उपक्रम जनतेमध्ये सादर करून जनजागृती केली. कोव्हिड काळात दिलासा (शिवभोजन थाळी), सर्वांगिण विकास (रोजगार), निरंतर शिक्षण सुरू (शिक्षण), पालघर जिल्हा पोलिस सक्षम, वैद्यकिय क्षेत्रात पालघर जिल्ह्याची कामगिरी, इतर सर्व उपक्रम व योजनांची माहिती लोककलावंतांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. या पथनाट्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *