
करोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. घरात चूल पेटनेही कठीण होत आहे. अश्या दुर्बल, गरीब कुटुंबाना “असम्पशन सिस्टर्स, राजोडी” संचालित “जिव्हाळा असम्पशन सामाजिक केंद्र, ” तर्फे वसईतील विविध पाड्यातील आदिवासी भगिनींना फीड इंडिया या संस्थेमार्फत मिळालेल्या धान्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक आणि महाराष्ट्र काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे उपस्थितीत होते. समीर वर्तक यांनी यावेळी ढासळते पर्यावरण व याचे संवर्धन याबाबत सविस्तर माहिती देत उपस्थिताना तुळशी, कोरफड, अडुळसा आणि ओवा या औषधी वनस्पतींची माहिती देऊन या वनस्पती आणि त्यांची लागवड करण्यासाठी सर्वांना कुंड्याही देण्यात आल्या. सोबत अर्जुन, कडुलिंब आदी आयुर्वेदिक औषधी झाडांचे वाटप करण्यात आले.
सिस्टर दिप्ती यांनी कोरोना आजाराच्या संक्रमाणापासून वाचण्याचे उपाय सांगण्यात आले सोबत ऑक्सिमीटर, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले.
असम्पशन सिस्टर्स तर्फे सिस्टर दिप्ती, सिस्टर गीता, सिस्टर जसिंता, सिस्टर प्रेसिला यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि त्यांना नेहमी मदत करणारे रेहान बरबोझ, स्प्लश बरबोझ, सॅम्युअल डीमोंटी, लिझ तुस्कानो आणि पिंकी दास हे स्वयंसेवक सोबत होते.
