विशेष प्रतिनिधी

वसई, दि. १५ जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकायांवर कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसील्या आज (१६ जुलै पासून शिक्षणाधिका-यांच्या दालनासमोर आमरण उपोषणाला करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना दिला आहे. माजी गट शिक्षण अधिकारी वसई राजेंद्र पाटील, यांना निलंबीत करावे, विषयतज्ञ प्रशांत वसाव , पोषण आहारात भ्रष्टाचार करणारे जिल्हा परिषद नवजीवन शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनावणे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबीत करण्यात यावे, वसई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत असलेली शिक्षकाची कमतरता त्वरीत भरण्यात यावी, वसई तालुक्यात १३ केंद्र प्रमुखांची आवश्यकता असताना फक्त ३ केंद्र प्रमुख उपलब्ध आहेत, उर्वरीत जागा त्वरीत भरण्यात याव्यात, ७ विस्तार अधिकान्यांची गरज असताना सद्यपरिस्थितीत केवळ एकच विस्तारः अधिकारी आहे, त्यांचीही त्वरीत भरती करण्यात यावी, शासनाकडून वसई तालुक्यातील शाळेच्या बांधकामासाठी येणारा निधी, जिल्ह्यातील इतर ठिकाणी वापरला जातो त्यामुळे वसईतील बहुतेक शाळांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. काही शाळा या अनधिकृत बाधकामामध्ये भरवल्या जात आहेत. काही शाळेत शौचालय, प्यायच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. सर्व जि.प. च्या शाळांमध्ये सी.सी. टी. व्ही. कॅमेरे बसवण्यात यावेत, शिक्षकांची बायोमॅट्रीक हजेरी घेतली जावी, अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करून त्या बंद करण्यात याव्यात, मोडकळीस आलेली नाळे येथील जि.प. शाळा पाहून तेथे नवीन इमारत बाधण्यात यावी, असा मागण्या सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसील्या यांनी सातत्याने केल्या होत्या. भ्रष्ट अधिकायाच्या कारभाराचे पुरावेही त्यांनी सादर केले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी १६ तारखेपासून ते पालघर ला आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *