
पेपरिका गार्डन रेस्टॉरंट नोटीस
वसई प्रभाग समिती एच मध्ये पेपरिका नावाचे हॉटेल स्टेला या ठिकाणी उघडले असून लोकांची या हॉटेलला गर्दी बघायला भेटत आहे परंतु समाजसेवक श्लोक पेंढारी यांनी या हॉटेलची चौकशी केल्यावर असे निर्देशनास आले की या हॉटेलला अग्निशमन यंत्रणेची कोणतीही परवानगी दिली गेलेली नाही गेले सहा महिन्यापासून हे हॉटेल विना परवानगीने चालू आहे व हे सगळं तेथील सहाय्यक अग्निशमन अधिकारी नंदकुमार शिंगरे यांच्याशी बोलणं केल्यावर समजले परंतु या अशा कित्येक हॉटेललांना अग्निशमन यंत्रणेची परवानगी नसते व हे अग्निशमन अधिकारी कुठेतरी आपली पोळी भाजायच्या विषयात गुंतलेले असतात गेल्या काही महिन्यात पहिले माणिकपूर पेट्रोल पंप च्या मागे गोडाऊनला लागलेली आग व त्याला नसलेली अग्निशमन यंत्रणेची परवानगी ही कुठेतरी जनतेची जीव घेण्याची सोय केलेली आहे असे समाजसेवक श्लोक पेंढारी यांनी म्हटले आहे तसेच त्यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांच्याशी जेव्हा चौकशीची मागणी केली तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करत आहे असे सुद्धा समाजसेवक यांनी म्हटले आहे व या हॉटेलला तब्बल 15 दिवसाची परवानगी असलेल्या चे कागदपत्राची नोटीस ही अग्निशमन यंत्रणेने बजावली आहे परंतु गेले दहा दिवस पासून कोणतेही कागदपत्र सादर केले गेले नाही व यामागे नंदकुमार शिंगरे यांचा या विना अग्निशमन परवानगी घेतलेल्या हॉटेल,लॉज, कंपन्या, व गोडाऊन यासारख्यांमध्ये हात आहे असे त्यांनी सांगितले आहे व श्लोक पेंढारी यांनी या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याची जबाबदारी उपायुक्त सदानंद पुरव यांच्याकडे मांडली आहे सदानंद पुरव यांनी दोन दिवसात सहाय्यक अग्निशमन अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल सादर करावा असे सांगितले आहे व समाजसेवक श्लोक पेंढारी यांनी जनतेला सुद्धा आव्हान केले आहे की आपण ज्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जात असाल तर ते कितपत योग्य आहे याची अगोदर पडताळणी करावी व अग्निशमन यंत्रणेला सुद्धा समाजसेवक यांनी खडसावून सांगितले आहे. सात दिवसात कोणतीही कारवाई केली नाही तर एक वेगळे पाऊल उचलून अनोखे पद्धतीत आंदोलन करण्यात येईल यात कोणताही कायदा किंवा सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्व अग्निशमन यंत्रणेचे मुख्य अग्निशमन अधिकारी व सहाय्यक अग्निशमन अधिकारी व उपायुक्त सदानंद पुरव हे जबाबदार असतील