
ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्याल , सत्पाळा, विरार पश्चिम येथे शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोजी वसई कोर्टातील न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त न्यायदानाची प्रक्रिया सामान्यजनांना कळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे उपक्रम शाळा , महाविद्यालयात राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम सेंट जोसेफ महाविद्यालयात राबविण्यात आला .
‘प्रोग्राम ऑन प्रॉपर्टी’ या व्याख्यानाचे खास विद्यार्थ्यांसाठी, कायदा प्रेमींसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालघर जिल्ह्याचे सेशन जज डॉ.सुधीर देशपांडे होते जे.एम.एफ.सी जज न्यायाधीश वाय.ए जाधव , सिव्हील जज ज्युनिअर डिव्हिजन ए.व्ही मुसळे आवर्जून उपस्थित होते.
जिल्हा आणि सत्र अतिरिक्त न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात म्हणाले,” वृद्ध मातापित्यांनी कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगण्याची आवश्यकता नाही आपल्याला आपली मुलं जर का घराबाहेर काढत असतील तर तुम्ही आमच्याकडे दाद मागू शकता तुम्हाला जर कोर्टाचा खर्च परवडत नसेल तर कोर्टाकडून शासकीय खर्चातून वकील पुरवण्याची व्यवस्था करत असते .
पुढे मत मांडताना सुधीर देशपांडे म्हणाले, विद्यार्थी मित्रांनी सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा आदर्श समोर ठेवून सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.
न्यायाधीश डॉक्टर देशपांडे यांनी सातबाराच्या उताऱ्यावरील नावा बद्दल त्याच्यामध्ये येणाऱ्या विविध कलमान बद्दल प्रॉपर्टी अॅक्ट बद्दल सविस्तर माहिती उपस्थित कायदाप्रेमी नागरिक आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना करून दिली .
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.ए जाधव यांनी आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात सांगितले,”शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये,असे म्हटले जाते परंतु कोर्टातील कटकटीचं किंवा विलंब लावणारी न्यायप्रक्रिया याला कारणीभूत असते त्याच बरोबर ती न्यायप्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी न्यायदान तुमच्यापर्यंत पोहोचवावे म्हणून त्या ठिकाणी मालसा आणि नालसा या दोन उपक्रमांची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आली आहे”. याची माहिती देखील त्यांनी पुरविली.
महाविद्यालय पातळीवरील होणाऱ्या रॅगिंग बद्दल बोलताना सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन ए.व्ही मुसळे म्हणाले,” महाविद्यालयातील रॅगिंग विषयी सक्त कायदा करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार ही जर आपण प्राचार्यांकडे केली तर त्यावर कडक कारवाई होऊ शकते.”
” या भागामध्ये अनेक प्रॉपर्टी विषयीचे डीस्प्युट हे आहेत अशा वेळेला सेंट जोसेफ महाविद्यालयात न्यायाधीशांनी येऊन मार्गदर्शन करणे हा खरच एक सुवर्णयोग आहे.” असे,प्रतिपादन ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो यांनी केले.सदर कार्यक्रमास ज्ञानदीप मंडळाचे उपाध्यक्ष जो अल्फान्सो आणि प्रख्यात वकील विल्यम्स फर्नांडिस देखील आवर्जून उपस्थित होते.
तरी प्राचार्य डॉक्टर सुभाष डिसोझा म्हणाले अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर शिबिरामुळे कायदा हा लोकांपर्यंत पोहोचेल आणि कायद्याविषयीचे भान लोकांमध्ये जागृत होईल; आणि लोक कायद्याचा उपयोग सहज करु शकतील याविषयी त्यांनी न्यायाधीशांचे आणि उपस्थित कायदा प्रेमींचे आभार मानले.
सदर उपक्रमासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर एडवोकेट स्टेविना दोडती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याची इच्छा का निर्माण झाली याचे विश्लेषण केले तसेच सर्व पाहुण्यांची यथार्थ ओळख करून दिली.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित मान्यवरांचे, प्रतिष्ठीत नागरिकांचे आणि वृद्धांचे कायद्याविषयीचे अनेक प्रश्न एडवोकेट जॉर्ज फर्गोस यांनी शंकांचे निरसन करून उपस्थितांना अधिकाधिक कायद्याचे ज्ञान करून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या आणि सहज शैलीमध्ये सहाय्यक प्राध्यापक जगदीश संसारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लाघवी भाषेत सहाय्यक प्राध्यापिका सोनल डाबरे यांनी केले.