


ठाणे (प्रतिनिधी)- जारो उत्साही रनर्सनी ठाण्याच्या रस्त्यांवर येऊन टोरेंट जीतो ठाणे हाफ मॅरेथॉन २०२२ च्या पहिल्या पर्वामध्ये सहभाग घेतला. ‘रन फॉर कॅन्सर’ या मुख्य थीमसह या शर्यतीमध्ये सर्व वयोगटातील व्यक्ती, विकलांग आणि जीवनाच्या विविध स्तरांमधील व्यक्ती एकत्र आले. रेमण्ड ग्राऊण्ड येथून इव्हेण्टला सुरूवात झाली आणि रेस ठाण्यातील नयनरम्य भागामधून जात रनर्स अखेर फिनिश लाइनजवळ परतले. सहभागी तीन विभागांतर्गत धावले – हाफ मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी रेस आणि ५ किमी रेस.
अभिनेता-मॉडेल ‘आयर्नमॅन’ मिलिंद सोमण यांनी १० किमी व ५ किमी रन्सना झेंडा दाखवला. यावेळी प्रख्यात मान्यवर उपस्थित होते जसे महाराष्ट्र सरकारचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे, खासदार (लोकसभा) डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, जीतो ठाणे चॅप्टरचे अध्यक्ष श्री. महेंद्र जैन, जीतो एज्युकेशनल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. अजय अशर आणि जीतोचे सर्वोच्च प्रमुख श्री. पृथ्वीराज कोठारी.
टोरेंट जीतो ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये कॅन्सरयोद्धांचा सहभाग दिसण्यात आला, ज्यामध्ये ७१ वर्षीय कॅन्सरयोद्धा मीरा पारेख या २१ किमी हाफ मॅरेथॉनमध्ये धावल्या. विविध विभागांमधील विजेत्यांना एकूण १८ लाख रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. महत्त्वाकांक्षी हौशी रनर्सनी ५ किमी रेसमध्ये सहभाग घेतला, तर रनिंगप्रेमींनी १० किमी रेसमध्ये सहभाग घेतला.
टोरेंट जीतो ठाणे हाफ मॅरेथॉन २०२२ मधील २१ किमी रनचा किताब प्रभावी १:७:४० या वेळेसह तिर्थ पुनने जिंकला. विष्णू राठोड १० किमी रनमध्ये विजेता ठरला. महिलांच्या विभागामध्ये लक्ष्मीने १:२०:६ वेळेसह २१ किमी हाफ मॅरेथॉन किताब जिंकला, तर कोमल जगदाळे १० किमी रनमध्ये विजेती ठरली.
”या हाफ मॅरेथॉनचा मुख्य उद्देश कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा होता. आम्ही विजेते, सहभागी आणि विभिन्न पार्श्वभूमीमधील व्यक्तींचे मनापासून अभिनंदन करतो, जे या थोर कार्याला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले. हा इव्हेण्ट कर्करोगावर मात करण्याच्या उद्देशासाठी धावण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी उत्तम संधी होती. पहिल्याच इव्हेण्टला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आमचा विश्वास आहे की, जीतो ठाणे हाफ मॅरेथॉन लवकरच ठाणे भागातील बहुप्रतिक्षित स्पोर्टिंग इव्हेण्ट बनेल,” असे जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. अजय अशर म्हणाले.
”आम्हाला टोरेंट जीतो ठाणे हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा खूप आनंद झाला आहे. हा अत्यंत सर्वसमावेशक इव्हेण्ट होता, ज्यामध्ये सर्व वयोगट, लिंग व क्रीडा क्षमता असलेल्या व्यक्तींचा सहभाग दिसण्यात आला. ठाणे, मुंबई आणि भारताच्या इतर भागांमधील हजारो रनर्स व प्रेक्षकांचा महामारीनंतर या भागातील पहिल्या रेसिंग इव्हेण्टमधील सहभाग पाहून आम्हाला अत्यंत प्रेरणादायी वाटले. आम्ही आमच्या सहयोगींचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला या हाफ मॅरेथॉनला भव्य यशस्वी करण्यामध्ये सहकार्य केले,” असे जीतो ठाणे चॅप्टरचे अध्यक्ष श्री. महेंद्र जैन म्हणाले.
ठाणे महानगरपालिका, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, क्रेडाय-एमसीएचआय ठाणे आणि श्री महावीर जैन हॉस्पिटल यांच्या सहयोगाने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गेनायझेशन (जीतो ठाणे) आणि जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट यांच्याद्वारे टोरेंट जीतो ठाणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.