पालघर दिनांक २७/५/२०२०
मा खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परीषद पालघरच्या योजनान संदर्भात आढावा बैठक आयोजीत केली होती तेव्हा आधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना , ठेकेदाराना पाठीशी घालू नका अशा सुचना दिल्या . पालघर ,वसई ,तलासरी ,डहाणु ,मोखाडा ,जव्हार ,विक्रमगड ,
वाडा ह्या तालुक्यात सुरु असलेल्या ,योजनांचा आढावा घेतला .
सोबत पालघर विधानसभा आमदार श्री श्रीनिवास वनगा व शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे उपस्थित होते .
पालघर तालुक्यातील उंबरपाडा – नंदाडे व १७ गावे योजनेतील पाणी सर्व गावाना जात नाही ,ह्या बद्दल नापसंती व्यक्त केली .
नवघर ,घाटीम , जलसार व अनेक गावांच्या तक्रारी आहेत , ही बाब आधिकार्याच्या निदर्शनास आणली , गावतील जनता पाणी विकत आणते तर नवघर घाटिम मधील आदिवासी दोन डोगर पारकरुन पाणी आणतात .
करवाळे ते नवघर नविन पाईप लाईन टाकली जाईल त्याला १२ लाख खर्च येणार आहे
डॅमवरील ६० HP ची मोटार बंद आहे ,त्या साठी ६० ते ७० हजार खर्च येणार आहे अशा अनेक अडचणी आहेत ,ही योजना जिल्हापरिषदे कडे वर्ग करायला हवी असे खासदार गावित म्हणाले .
मासवण व पाच गावे पाणी योजने मुळे ,मासवण ,गोवाडे ,वसरोली , खारशेत ,निहे ,लोवरे ह्या गावाना पाणी मिळणार आहे ,पाच कोटी रुपये ह्या योजने साठी खर्च येणार आहे ,पण पाण्याच्या टाक्या फॉरेस्ट जागेत येतात ,लवकरच हा विषय फॉरेस्ट खात्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल .
माहीम – केळवा १७ गावे ह्या योजनेला अंदाजे ६५ कोटी खर्च येणार आहे ,जल जिवन मिशन अंतर्गत योजना आहे ,ह्या वर चर्चा झाली .
कमारा व काही गावान मध्ये माण्याचे बोर मंजूर आहेत पण वनविभागा मुळे काम अडले आहे .
पालघर तालुक्यात ८४ पैकी २५ बोरवेल पुर्ण आहेत वसई ग्रामीण मध्ये ३४ पैकी १६ पुर्ण आहेत .
तलासरी तालुक्यात झरी पाणीपुरवठा योजना पुर्ण होत आली आहे ,३० जुन २०२० ला पाणी ही सुरु होईल ,वेलजी व गिरगाव पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत .
मोखाडा तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाई जाणवत असते .,५५ गावपाडे योजना एम जी पी राबविणार आहे ,प्लॅन एस्टीमेट तयार आहे ,त्या मुळे मोखाडा तालुका टॅकर मुक्त होणार आहे . मोखाडा नगरपंचायती साठीही एम जी पी मार्फत पाणी योजना होणार आहे .
डहाणु ,जव्हार ,वाडा ह्या तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आली .
खासदार श्री राजेंद्र गावित साहेबानी शेवटी सर्व आधीकार्याना सुचना दिल्या प्रथम पाणी पिण्या साठी .
आपण कामे जनते साठी करा ,कोणाच्या दबावाना बळी पडु नका ,मी आपल्या सोबत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *