आज डहाणू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डहाणू तालुका प्रमुख श्री अशोक भोईर यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि वसई विरारशहर महानगर पालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील नाना कार्यध्यक्ष बवीआ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.हा प्रवेश मी बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील,आमदार क्षितीज ठाकूर आणि आप्पा यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन केला असल्याचे अशोक भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी अशोक भोईर यांची बहुजन विकास आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी,तर अभिजित देसक यांची जिल्हा युवा उपाध्यक्ष आदिवासी सेल,तसेच सुरेश पाडवी यांची पालघर विधानसभा अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत चंदू धांगडा ,चंदू करमोडा,सुनिल गांगडे,जयवंत का, सुदाम धांगडा, लहानु भोवर,राहुल बालोडा,राहुल बसवत,अजय धडपा,अशोक वाडिया यांच्या सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात आज बहुजन विकास आघाडी मध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष संतोष बुकले,डहाणू तालुका अध्यक्ष अरुण निकोले,बहुजन विकास आघाडी आदिवासी सेल युवा जिल्हाध्यक्ष प्रसाद पऱ्हाड,माजी जी प सदस्या मलावकर मॅडम ,रणधीर कांबळे,