
दि. ९ आँक्टोबर २०२०, डहाणू – विरार रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाराचा मुंबई रेल्वे विकास महामंडळाने MUTP-3 अंतर्गत हाती घेतलेला प्रकल्प भुसंपादनाच्या चक्रव्यूहात अडकून दोन वर्ष मागे पडला आहे. सुरुवातीला मार्च २०२३ पर्यंत प्रकल्प पुर्णत्वास नेण्याचे लक्ष समोर ठेऊन मुंबई रेल्वे विकास महामंडाळाने काम सुरु केले होते आणि त्यासाठी डिसेंबर २०१९ पर्यंत भूसंपादन होणे अपेक्षित होते. भूसंपादन करण्याची प्रक्रिया अजूनही पुर्ण झाली नसून मार्च २०२१ पर्यंत भूसंपादन पुर्ण होण्याची शक्यता MRVC कडून वर्तवण्यात आली आहे. भुसंपादन दोन वर्ष लांबल्यामूळे भूसपाटी करण आणि पुलांचे बांधकाम पुर्ण होण्याचे लक्ष आता डिसेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आले असून रेल्वे रुळ आणि स्थानक इमारतींचा शेवटचा टप्पा पुर्ण होण्याचे लक्ष मार्च २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
तथापि ताब्यात असलेल्या भूमी वर भुसपाटीकरण व पुल बांधण्यासाठीची दोन कंत्राटे देण्यात आली असून मुख्य पुलांच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत असे MRVC कडून सांगण्यात आले आहे.
असे असले तरीही प्रकल्पाचे विविध टप्पे पुर्णहोण्याच्या तारखा ह्या अंदाजे दिलेल्या असून त्यावेळेवर काम पुर्ण होणे हे सर्स्व भूसंपादनाच्या पुर्ण होण्यावर अवलंबून असल्याचेही MRVC कडून सांगण्यात आले आहे.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. हितेश सावे ह्यांना माहिती अधिकारात ही माहीती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडून प्राप्त झाली आहे.
एकूण भुसंपादना पैकी फक्त अंदाजे ३०% भूसंपादन पुर्ण झाले असून पुढील सहा महिन्यात १००% भुसंपादन कसे पुर्ण होणार हा प्रश्नच आहे.
डहाणू ते विरार पट्ट्यातील दैनंदिन प्रवाशांसाठी महत्वाच्या असलेल्या ह्या प्रकल्पावर स्थानिक लोक प्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून प्रकल्पाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
