

दि. १३/०९/२०१९ रोजी सायंकाळी उशिरा रेल्वे बोर्डाच्या मार्फत गाडी क्र. १२४७१/७२ – वांद्रे टर्मिनस ते कटरा (माता वैष्णव देवी) स्वराज एक्सप्रेस व १६२०९/१० – अजमेर मैसूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या थांब्याची बातमी हाती आली आणि सर्व सदस्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. DVPSS च्या टेक्निकल टीम च्या अभ्यासाचा पुरेपूर वापर करून संस्थेने या गाड्यांची मागणी २०१७ पासून केली. संस्थेने पाहिले पत्र २०१७ साली तत्कालीन रेल्वे मंत्री श्री. सुरेश प्रभू यांना दिले. गेली तीन वर्षे सलग पाठपुरावा कायम ठेवत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री श्री.अरविंद सावंत, खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री.अमित घोडा, खासदार श्री.अप्पा बारणे, खासदार श्री.राजेंद्र गावित, पश्चिम रेल्वे चे जनरल मॅनेजर, रेल्वे बोर्ड- दिल्ली यांना वारंवार या गाड्यांचा थांबा पालघर ला मिळण्यासाठी पत्र व्यवहार व भेटीगाठी घेतल्या.
या गाड्यांचा फायदा काही प्रमाणात दैनंदिन प्रवाश्यांनाही होणार आहे त्या अनुषंगाने पालघर जिल्हाधिकार्याच्या हस्तेही पश्चिम रेल्वे च्या जनरल मॅनेजर व रेल्वे बोर्ड साठी पत्र पाठवण्यास आग्रह धरला होता व तसे सकारात्मक सहकार्य लाभले सुद्धा. तसेच पालघर जिल्ह्यातील सर्वच पत्रकार मित्रमंडळींचेही वेळोवेळी सहकार्य लाभले. सर्व पत्रकारांनीही संस्थेच्या प्रत्येक पत्राची दखल घेऊन पालघर स्थानकाच्या विविध समाश्यांना वाचा फोडली आहे.
गेल्या १६ वर्षात आज ज्या अति महत्वाच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे त्या गाड्यांचा उपयोग पालघर जिल्ह्यातील सर्व समाजाला होणार आहे. उदा. जसे हिंदू धर्मियांच्या प्रवाश्यांना वैष्णोदेवी ला जायला मिळेल तसेच मुस्लिम समाजाला अजमेर ला अजमेर शरीफ दरगाह ला जाण्यास सुलभ होईल. या दोन्ही गाड्यामुळे पालघर चा प्रवासी दोन्ही ठिकाणच्या पर्यटनाच्या दृष्टीनेही नक्कीच वाढ होण्यात हातभार लागेल. पालघर रेल्वे स्थानक कर्मचारी व ZRUCC सदस्यांचेही या कार्यात सहकार्य लाभले.
या गाड्यांच्या उदघाटनाचा कार्यक्रम डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने खालील सर्व गाड्यांच्या लोको पायलट ला शाल, श्रीफळ तसेच मिठाई वाटप करून प्रमाणे संपन्न केला. तसेच संस्थेच्या वतीने टेक्निकल टीम ने गाडीच्या लोको ला पुष्पहार लावून जल्लोष साजरा केला.
१) १२४७१ वांद्रे टर्मिनस ते वैष्णवी देवी कटरा स्वराज एक्सप्रेस सोमवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार पालघर सकाळी ९.१८[दि.१३/०९/२०१९] उदघाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री .नागदेव पवार, उपाध्यक्ष श्री .सतीश गावड, सहसचिव श्री.प्रथमेश प्रभुतेंडोलकर, सल्लागार श्री.महेश पाटील आणि सहसल्लागर श्री.सखाराम पाटील तसेच पालघर स्टेशन कमिटीचे अध्यक्ष श्री.प्रतिक पाटील, श्री.हिमांशू वर्तक आणि सर्व रेल फँन उपस्थित होते.
२) १६२०९ अजमेर मैसूर रविवार,शुक्रवार पालघर रात्री २१.५५ [दि.१३/०९/२०१९] उदघाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री .नागदेव पवार,सचिव श्री .दयानंद पाटील,सहसचिव श्री .प्रथमेश प्रभुतेंडोलकर,महिला प्रतिनिधी आणि संघटक सौ.रुत लिंगायत आणि पालघर स्टेशन कमिटि अध्यक्ष श्री.प्रतिक पाटील, सदस्य श्री .रुमी फिदाई, श्री.हृदयनाथ म्हात्रे, श्री.विराज म्हात्रे, श्री.हिमांशू वर्तक उपस्थित होते.
३) १६२१० मैसूर अजमेर एक्सप्रेस बुधवार , शुक्रवार पालघर रात्री २३.३६ [दि.१३/०९/२०१९] उदघाटन कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव श्री .प्रथमेश प्रभुतेंडोलकर, पालघर स्टेशन कमिटी सदस्य श्री .रुमी फिदाई,श्री .रुद म्हात्रे,श्री .विराज म्हात्रे,श्री .हिमांशू वर्तक, श्री.प्रफुल्ल गावड उपस्थित होते.
४) १२४७२ वैष्णवी देवी कटरा ते वांद्रे टर्मिनसस्वराज एक्सप्रेस बुधवार, गुरुवार,शनिवार, रविवार पालघर दुपारी १६.१८ [दि.१४/०९/२०१९] उदघाटन कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव श्री .प्रथमेश प्रभुतेंडोलकर,पालघर स्टेशन कमिटि सदस्य श्री .रुमी फिदाई,श्री.रुद म्हात्रे,श्री .विराज म्हात्रे,श्री .हिमांशू वर्तक उपस्थित होते.
वरील सर्व लोकप्रतिनिधिंचे व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे खूप खूप आभार!