आज दि.१९/१०/२०२० रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, झेड आर यू सी सी. सदस्य (परे),पालघर स्टेशन कमिटीचे सदस्य व प्रवासी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने पालघर आमदार श्री श्रीनिवास वनगा साहेब तसेच श्री मिलिंद किर्तीकर , पालघर स्थानक अधिक्षक यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
कोरोना महामारी काळात बंद असलेली रेल्वेसेवा टप्या टप्याने सुरू होतेय.
या काळात विविध कोव्हिड विशेष गाड्या सुरू झालेल्या आहेत.
यातील मुळ गाड्यांना पालघर,बोईसर, डहाणू येथे थांबे होते.
पण त्या ऐवजी कोविड स्पेशल म्हणून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना पालघर, डहाणू,बोईसर येथे थांबे देण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे आपल्या परिसरातील लोकांना सदर गाड्यांचा फायदा होत नाही.
बोरीवली किंवा वापी येथे जाऊन गाडी पकडणे फारच त्रासदायक ठरत आहे.
या गाडीतील प्रवाशांना उपनगरीय गाडीत प्रवेश बंदी आहे त्यामुळे एकतर खाजगी किंवा इतर पर्यायी खर्चिक व जोखमीचे मार्ग वापरावे लागत आहेत.
अगोदरच रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण आणि गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणूनच मुळ गाड्यांना ज्या स्थानकांवर थांबे होते त्याचप्रमाणे विशेष गाड्यांना थांबे मिळावे यासाठी.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव प्रथमेश प्रभुतेंडोलकर, झेड आर यू सी सी. सदस्य श्री सदानंद पावगी, पालघर स्टेशन सल्लागार समिती सदस्य हिमांशू वर्तक व ललीत जैन, रेल्वे अभ्यासक विराग म्हात्रे तसेच
शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख श्री राजेश शहा व तालुकाप्रमुख श्री. विकास मोरे यांनी पालघर मतदारसंघाचे आमदार श्री श्रीनिवास वनगा साहेब, जिल्हाधिकारी पालघर कार्यालय, पालघर रेल्वे स्थानक प्रबंधक श्री मिलिंद किर्तीकर यांची भेट घेऊन प्रवाशांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
याच पद्धतीने सर्वसमावेशक शिष्टमंडळ लवकरच पालघरचे खासदार माननीय श्री राजेन्द्र गावीत साहेब व इतर लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *