महाराष्ट्रातील जाहिरातमुक्त आणि पूर्णत: निशुल्क असलेले एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली या आगळयावेगळ्या मांडणीच्या वृत्तपत्राने वर्षभरात एकूण ३१० अंक प्रसिद्ध करून शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. याचा प्रथम वर्धापन दिन दि. १५ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त राज्यभरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा संदेश पाठविले, अनेक जिल्हा तसेच तालुका प्रतिनिधी आणि हितचिंतक मित्रमंडळींनी बॅनर बनवून समाजमाध्यमातून प्रसिद्ध केले. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. सर्व प्रतिनिधी आणि मान्यवरांची झुम मीटिंग घेण्यात आली. सोबतच पाक्षिक रयतेचा वाली अंक ४ चे प्रकाशनही राज्यातील पहिले बालरक्षक जगदीश कुडे गुरुजी यांच्या शुभहस्ते लोकशाही दिनी करण्यात आले. या मिटिंगच्या माध्यमातून रयतेचा वालीची पुढील दिशा कशी राहील याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. रयतेचा वाली निरंतर सुरू राहावा अशी अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केली. बालरक्षक चळवळीतील महिला भगिनींनी रयतेचा वालीचे संपादक शाहू भारती यांना ग्रुप कॉल करून शुभेच्छा देत आनंदाचा सुखद धक्का दिला.
राज्यातील सर्व परिचित, अपरिचित यांनी प्रतिक्रिया आणि शुभेच्छा संदेश पाठवून रयतेचा वाली परिवाराचे कौतुक केले. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार ! भविष्यातही सर्वांचे असेच सहकार्य लाभावे. उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *