

मुंबई प्रतिनिधी:
सर्वोद्य फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.अनुराधा पौडवाल यांच्या वतीने
कोरोना विषाणू संक्रमण नियंत्रण व उपाययोजना करिता मा.पंत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहाना नुसार सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन जे.जे रुग्णालय (मुंबई) येथे कोरोना ग्रस्थ रूग्णावर तातडीचे उपचार करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री खरेदीसाठी देणगी देण्यात आली.यावेळी जे.जे.हॉस्पिटल आधिक्षक डॉ.संजय सुरसे,डॉ.दिलीप गवरी,मुख्य मेडिकल सोशल वर्कर श्री विभुते,नाना पालकर स्मुती समितीचे व्यवस्थापक श्री.कुष्णा महाडिक उपस्थित होते.कोरोनाचा प्रादूर्भाव देश भरात आणि राज्यात दिवसेंदिवस वाठत आहे विशेष करुन मुंबईत करोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णावर तातडीने उपचार योजना करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून लागणारी यंत्र सामुग्री घेण्यासाठी डॉ.अनुराधा ताई पोडवाल संस्थापक अध्यक्ष
सर्वोद्य फौंडेशन यांचा वतीने देणगी देण्यात आली.