

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालाय, चंद्रपूर, कर्मवीर महाविद्यालय, मुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर व आंबेडकरवादी इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय सामाजिक विज्ञान अणुसंशोधन परिषद प्रायोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती पर्वावर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टीकोन” या विषयावर आधारित दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतररासष्टीय परिषद संपन्न होत आहे. या परिषदेचा उद्घाटन समारंभ २५ जून २०२२ ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे सन्माननीय कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडला उद्घाटन भाषणात ते म्हणालेत कि, डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या प्रकाशात आपण सर्व उजळून निघावे असा समता मूलक विचार त्यांच्या संघर्षात आणि विद्वत्तेत आहे असे विचार त्यांनी मांडले. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर चे सहसचिव सन्माननीय कुणाल घोटेकर अध्यक्षीय भाषणात ते म्हणालेत कि, भारतातील इतिहासात जे वेगवेगळे संशोधनाचे विचार प्रवाह आहे त्यात भारतातील खालच्या वंचितांचा विचार नव्हता. डॉ. आंबेडकरांनी तो विचार आपल्या संघर्षातून व ज्ञानाच्या आधारावर समाज मनावर बिम्बविला आणि अलीकडच्या काळात म्हणून इतिहासाची मांडणी करतांना आंबेडकरवादी दृष्टीकोनातून ती व्हावी म्हणजे आपल्या पुढील समस्या निवारण्यात मदत होईल. संशोधकांनी डॉ. आंबेडकरवादाचा दृष्टीकोन स्विकारा असे मत व्यक्त केले. याप्रसंगी मान. बाळूभाऊ धानोरकर, खासदार चंद्रपूर-आर्णी- वणी लोकसभा क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात ते म्हणालेत कि, सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या समस्या संशोधकांनी व प्राध्यापकांनी लोकशाही पद्धतीने सोडवण्यासाठी येणाऱ्या भावी पिढीला तयार करावे असे मत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे अॅड. बाबासाहेब वासाडे अध्यक्ष शिक्षण प्रसार मंडळ, मुल हे उपस्थित होते. बिजभाषक युजीसी चे माझी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी आपल्या बिजभाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतातील जाती व्यवस्थेची चिकित्सा केली त्यातून विषमता निर्माण झाली. या विषमतेवर मात करण्यासाठी भारतीय इतिहास परंपरेची चिकित्सा करावी सर्वांना त्यात न्याय, स्वातंत्र व समता निर्माण व्हावी अशी व्यवस्था निर्माण करण्याचे बळ प्राप्त करावे असे मत व्यक्त केले. आभासी पद्धतीचे प्रमुख वक्ते डॉ.रोजल भडके यांनी परिषदेला शुभेच्या दिल्या व परिषदेला संबोधित केले. प्रमुख उपस्थिती आंबेडकरवादी इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदेश वाघ, सचिव डॉ. संतोष बन्सोड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर संस्थेचे उपाध्यक्ष मान. अशोक घोटेकर, सचिव मान. वामनराव मोडक, प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर, डॉ. कार्तिक पाटील प्रभारी प्राचार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर व डॉ. अनिता वाळके प्रभारी प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय, मुल हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांनी केले प्रस्ताविकातून त्यांनी परिषदेची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर महाजन यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. मनोज सोनटक्के यांनी केले या परिषदेला भारतातील प्राध्यापक, संशोधक व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.