आपणास कळवीण्यास आनंद होत आहे की,नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल डॉ. खान मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार, मंगळवार दि. 15 जून २०२१ रोजी ग्रामपंचायत तरखड हद्दीतील ग्रामस्थानसाठी ज्यांची वयाची ४५ वर्ष पुर्ण आहेत अशा ग्रामस्थांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला नाही अशा ग्रामस्थांना लसीचा पहिला डोस नॉट्री डॅम स्कूल तरखड येथे देण्यात येईल .

  • प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतच्या सर्वे नुसार ज्यालोकांची वयाची ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत व त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला नाही अशा लोकांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीकडे उपलब्द असल्याने फक्त त्याच लोकांना पहिली लस देण्यात येईल.कोणीही गैर समज करून घेऊ नये.
  • ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना प्रथम प्राधान्य देण्याची विनंती आहे. तसेच कोणीही लसीकरण केंद्राच्या ठिकाणी (नॉट्री डॅम स्कूल तरखड) मध्ये वादविवाद करू नयेत याची नोद घ्यावी.
    -सदर व्यक्तींना लस घेण्याआधी अँटीजेन टेस्ट करावी लागेल.
  • लसीकरणासाठी न्याहारी( नाष्टा )करून येणे. कृपया रिकामी पोटी येऊ नये.
  • येताना कृपया आपले आधार कार्ड आणि वैध फोन नंबर घेउन येणे. तसेच तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
  • आपण लसीकरण केंद्रावर लवकर पोहोचल्यास कृपया एकमेकांमध्ये किमान ३ फूट अंतर राखून रांगेत उभे रहावे ही विनंती.
  • पुढील १८ ते ४४ या वयोगटातील ग्रामस्थांसाठी लस उपलब्ध झाल्यावर आपणा सर्वांना कळविण्यात येईल.
  • आपल्या ग्रामस्थानच्या हितासाठी हे कायमस्वरूपी लसीकरण केंद्र व्हावे अशी आमची इच्छा असल्याने कृपया कोणतेही वादविवाद करू नयेत.
    सरपंच / ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य
    ग्रामपंचायत तरखड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *