
मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनाही महाराष्ट्राच्या सत्तेपासून वंच्छित राहावे लागले होते: मा. आमदार प्रकाश गजभिये

औरंगाबाद: परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा. आमदार प्रकाश गजभिये यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार आंदोलनात शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मा. आमदार प्रकाश गजभिये म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने पारित केला. परंतु जातीयवादी लोकांना हे पटले नाही. त्यांनी याला तीव्र विरोध करीत मराठवाडा पेटविला. नामांतर आंदोलनात मराठवाड्यातील ३५० घरांवर हल्ले झाले, ३४०० कुटुंबाची धूळधाण झाली. २१०० घरे बेचिराख झाली. ९२५ स्त्रियांवर बलात्कार झाले. २४० आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जीवानिशी मारले गेले.एवढा मोठा अनर्थ फक्त जातीय द्वेषातून झाला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी कशाचीही पर्वा न करता मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे केले व यामुळे त्यांची सत्ता सुध्दा महाराष्ट्रातून गेली नामकरण केल्यामुळे साहेबांना त्याची किंमत चुकवावी लागली. परंतु साहेबांनी आंबेडकरी जनतेचा सन्मान केला असे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगितले. यावेळी केक कापून हर्षबोधी भंतेजीच्या हस्ते सर्वांना केक वाटप करण्यात आला.
व आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच सर्व महिला,भिक्षूं व नागरिकां तर्फे
मेणबत्ती ची रॅली काढण्यात आली. यावेळी भदंत हर्ष बोधी यांनी पंचशील त्रिषरण ग्रहण केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो नामविस्तार दिन चिरायू होवो शरद पवार साहेब आप आगे बढेl हम आपके साथ है अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी परिसर जय भीम च्या घोषणांनी दणाणून गेला होता
यावेळी भन्तेजी हर्षबोधी, प्रतिभाताई वैद्य, विद्या मोरे,विलास मगरे ,कैलास मगरे, अमोल दांडगे, दीक्षा पवार, सरताज खान,शुभम साळवे, संध्या शिरसाठ, विजय गजभिये ,राजू कस्तुरे, महेंद्र तुपे, सर्ताज खान, सुनील धवारे,आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.: