
चिपळूण – ( मन्सूर सरगुरोह) : मुंबईतील दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी राजगृहावर हल्ला झाला असून या घटनेचा चिपळूण काँग्रेसततर्फे निषेध करण्यात येत असून हा हल्ला करणार्या समाजकंटकांना महाराष्ट्र पोलिसांनी त्वरीत पकडून अटक करावी, अशी मागणी चिपळूण नगर परिषदेचे काँग्रेस गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक सुधीरशेठ शिंदे यांनी केली आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय.
राज्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना अशा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, म्हणून आंबेडकर कुटुंबियांनी शांततेचे आवाहन केले आहे, त्यामुळे आपणदेखील सनदशीर शांततामय मार्गाने न्यायाची मागणी करीत आहोत. आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी चिपळूण काँग्रेसतर्फे चिपळूण नगर परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक सुधीरशेठ शिंदे यांनी केले आहे.