

अर्तिशय दुःखद व वेदनादायी एक्झिट.विनोद गायकवाड सर,हे पिटर काॅलेज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर काॅलेजचे प्राचार्य होते.अतिशय विद्वान;अभ्यासु,प्रतिभावंत, दानशुर व सर्वांशी मैत्री जपणारा माणुस होता.आपल्या काॅलेजमंधे,त्यांनी तळागाळातील,गरजु,गरीब व वंचित समाज घटकांतील विद्यार्थिना शिक्षणासाठी खुप मदत केली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या पालघर येथिल जाहीर सभेत श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सरांचा, समाजभुषण म्हणुन सत्कार केला होता.मागिल,महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेच्या,निवडणुकिच्या वेळी वंचित बहुजन आघाडीची,विरार येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते.तेव्हा,श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब हेलिकाॅप्टरने सभेला येणार होते व वसईला हेलीपॅडची व्यवस्था करावयाची होती.तेव्हा,हेलीपॅडची जागा शोधुन देण्याचे काम ते तहसिलदार व पोलिसांच्या परवानगीचे काम करवुन देण्यात गायकवाड सरांचा सिहांचा वाटा होता.ते जरी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सभासद किंवा कार्यकर्ते नसले,तरी कित्येक वेळा,त्यांनी पक्षाला सढळ हस्ते एक समाज बांधव व आंबेडकरी विचारधारेचा माणुस ,म्हणुन खुप मदत केली आहे.असा दानशुर व समाजाला नेहमी मदत करणारा समाजसेवक व शिक्षणमहर्षि आपल्यातुन निघुन गेला आहे.त्यांच्या जाण्याने समाजाची व शिक्षण क्षेत्राची खुप हानी झाली आहे.सर,आज आम्ही सर्व नि:शब्द आहोत.मृत्यु जरी अटल आहे.तरी तो किती क्रृर आहे,हे आज ज्ञात झाले.संपुर्ण वंचित बहुजन आघाडी,पालघर जिल्हा व वसई विरार जिल्हयाच्या वतीने सरांना भावपुर्ण श्रद्धाजंली वाहत आहे.साधु साधु साधु