

वार्ताहर- पुनश्च हरि ओम करत टाळेबंदी उठून सर्व काही सुरळीत सुरू असताना पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मुळे परत एकदा टाळेबंदी ची शक्यता नाकारता येत नाही. हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाची परिस्थिती बिकट होत चालली आहे.अशातच एखाद्या मजुराला कामाच्या ठिकाणी अपघात घडला तर उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सरकारी रुग्णालयात वाढता कोरोना लक्षात घेता खासगी रुग्णालयात उपचार करणे या मजूर वर्गाला परवडत नाही. खासगी रुग्णालयात अनामत रक्कम भरल्या शिवाय दाखल करून घेत नाहीत. अशातच एक मजूर प्रकाश वागरी (३५वय) मजुरी करताना त्याचा अपघात झाला, त्याचे L1 Spine Fracture झाले व दोन्ही पायांची हालचाल मंदावली आणि लघवी/शौच ची नस दबल्यामुळे त्याला नैसर्गिक विधी करण्यास अडचणी येऊ लागल्या. आमची वसई चे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्या सूचनेनुसार सदर रुग्णाला वसई येथील रवी हॉस्पिटल येथे विना अनामत रक्कम न भरता आपत्कालीन परिस्थितीत दाखल करून घेतल व डॉ विवेक नायक (अस्थिविकर तज्ञ) यांच्या हस्ते त्यांचं मणक्याच (Instrumentals & Decompression) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. माफक दरात त्यांची शस्त्रक्रिया पार पडली. या कोविड प्रादुर्भाव काळात अनामत रक्कम न घेता जोखमीचे शस्त्रक्रिया डॉ विवेक नायक यांनी केली यासाठी त्यांचे आभार प्रदर्शन रुग्णाच्या वडिलांनी केले.आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे व डॉ विवेक नायक (रवी हॉस्पिटल) यांच्या कडून असेच सहकार्य या कोविड काळात व्हावे यासाठी त्यांचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहेत.