
जिल्हा परिषद पालघर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखुमूक्त शाळा अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हास्तरीय ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागाचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा. लता सानप मॅडम व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संगिता भागवत मॅडम अति जिल्हा शल्यचिकित्सक पालघर तथा NCD नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र केळकर यांनी संबंधित कार्यशाळेला उपस्थितांना मार्गदर्शन केले. पालघर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख प्रत्येक तालुक्यातील 5 तज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांना तंबाखू मुक्त शाळेचे 9 निकष व टोबॅक्को फ्री स्कुल अॅप बद्दल माहिती सलाम मुंबई फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री. जयेश माळी यांनी केले.तर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम चे सामाजिक कार्यकर्ते श्री. राजपूत आणि अंजु चोरे तर नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा समन्वयक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी सुत्रसंचलन करून तंबाखूमुक्तची संकल्पना शपथ घेऊन तंबाखुमुक्त शाळा अभियान ऑनलाईन जिल्हा स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.