
पाण्याची नादुरुस्त पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी तरखड ग्रामपंचायतीने अर्नाळा वसई हा मुख्य रस्ता देवतलाव नाक्यावर संपूर्ण खोदून ठेवला आहे. रस्त्याच्या एका बाजूने दुचाकी जाईल इतकी जागा देखील न सोडता विचित्रपणे खोदकाम करण्यात आलेले आहे.
अर्नाळा, आगाशी, उंबरगोठण येथून वसई कोर्ट, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय येथे जाण्यासाठी ह्याच रस्त्याचा वापर केला जातो. बंगली रोड येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात जायचे असल्यास याच रस्त्याने जावे लागते.
असे असताना ह्या मुख्य रस्त्यावर तरखड ग्रामपंचायतीने नागरिकांची गैरसोय लक्षात न घेता पूर्ण रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले आहे. यामुळे वसई तहसील कार्यालय, वसई कोर्ट तसेच बंगली हॉस्पिटल येथे जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून तरखड ग्रामपंचायतीच्या अक्कलशुन्य कारभाराबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.