

प्रतिनिधी:
तसे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट आपण पाहतोच. अधिकारी/ कर्मचारी व दलालांचा खास याराना असतो. अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरिता दलाल म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडीच असते. वसई तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालये, तलाठी कार्यालये या शासकीय कार्यालयांमध्ये खुल्लमखुल्ला दलाल फिरताना दिसतात. या दलालांना शासकीय कार्यालयांमध्ये बंदी घालावी.
लोकांकडून थेट पैसे घेणे अधिकारी / कर्मचाऱ्यांना धोक्याचे असते. कधी कोणी तक्रार करेल याची भीती असते. म्हणून अधिकारी/ कर्मचारी हे दलाल पाळतात. दलालांच्या माध्यमातून पैसे घेण्यात अधिकारी/ कर्मचाऱ्यांना काही अडचण नसते. सर्वात मोठा भ्रष्टाचार हा महसूल विभागात होत असतो. वसई तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालये, तलाठी कार्यालये या शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट पहावयास मिळतो. या दलालांवर प्रशासनाने बंदी घालावी. एकही दलाल दिसता कामा नये. शासकीय कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही लावा. सीसीटीव्हीमध्ये दलालांचे चित्रीकरण होईल. मग या दलालांना कार्यालयातून हद्दपार करणे सोपे होईल. शासनाने या बाबतचे परिपत्रक काढावे. दलाल बंद म्हणजे बंद. या दलालांच्या माध्यमातून अधिकारी / कर्मचारी अंदाधुंद भ्रष्टाचार करतात. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन त्वरित दलाल बंदीचे आदेश जारी करावेत.