
🔴 अंबाडी नाक्यावरील शिट्टी वाजणे बंद होणार
मीरा भाईंदर वसई विरार पलीस आयुक्तालय मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणारे व पोलीस मित्र म्हणून मागील 33 वर्षापासून विशेष ओळख असणारे तानाजी नारायण चौगुले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली आहे . त्यांनी वसई वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
आहे, त्यांच्यावर पोलीस दलातून व सर्वसामान्य नागरिकांमधून
अभिनंदन चा वर्षाव करण्यात येत आहे
तानाजी चौगुले हे 1991 ला पोलीस दलात भरती झाले. तत्कालीन ठाणे जिल्ह्यामधील माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांची 7/12/ 1991 मध्ये पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी भाईंदर येथे डीसीपी कार्यालयात काम केले व पुन्हा त्यांची वसई येथे बदली झाली. ठाणे ग्रामीण मध्ये ज्यावेळेस वाहतूक शाखा नव्याने स्थापन झाली त्यावेळेस त्यांची वाहतूक शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली त्यामुळे त्यांचा दररोज नागरिक व संघटना सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्याशी नियमित संबंध येऊ लागला ,प्रत्येक काशी आपुलकीने प्रेमाने मित्रत्वाने वागून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली ते पोलीस म्हणून कधीच सर्वसामान्यांशी वागले नाहीत तर एक आपल्यातला सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांनी प्रत्येकाची समस्या जाणून घेतली व प्रत्येकाला कायद्यात राहून जेवढि मदत करता येतील तेवढि त्यांनी मदत केली, आज वसई तालुक्यातील एकही अशी व्यक्ती सापडणार नाही की चौगुले यांना ओळखत नाही, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी त्यांचा नेहमीच हातकंडा असे ते ड्युटीवर यायच्या आधी वसई पश्चिम येथील अंबाडी नाका येथे शिट्टी वाजवायचे त्यांच्या शिट्टी वाजविण्या मध्ये एक विशेष आवाज होता व धाक होता, अंबाडी नाक्यावर शिट्टी वाजली ! याचा अर्थ चौगुले साहेब ड्युटीवर आले, त्यांच्या शीट्टीचा आवाज ऐकूनच वाहन चालक, रिक्षा चालक आपापली रिक्षा रांगेमध्ये लावत अथवा जिथे वाहतूक कोंडी केली असेल तिथून तात्काळ पुढे निघून जात ,अशी त्यांची विशेष ओळख झाली होती, मात्र आता त्यांची बढती झाल्याने व ते अधिकारी पदावर गेल्याने अंबाडी नाक्यावर वाजणारी शिट्टी बंद होणार आहे, व रिक्षा चालकांना वाहन चालकांना व सर्वसामान्य नागरिकांना चुकल्यासारखे होणार आहे एवढं मात्र नक्की ,
चौगुले आले की त्यांची शिट्टीच अशी वाजायचे की अर्धी वाहतुक कोंडी त्यांच्या शिट्टी वाजविल्याने कमी व्हायची ,
तानाजी चौगुले सध्या मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांना यापूर्वी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यामार्फत अभिनंदनचे पत्र दिलेले आहे, विविध सामाजिक संघटना पक्ष यांच्याकडून त्यांचा वेळोवेळी गौरव झालाय व त्यांना पुरस्कार देखील मिळाले आहेत, कोरोना काळामध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे त्यामुळे विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन झाले आहे तसेच त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे ,ठाणे पालघर व आता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ते मागील 33 वर्षापासून आपली अविरत सेवा बजावत आहेत, नुकतेच राज्य शासनाने 70 पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती दिली यामध्ये तानाजी चौगुले यांना देखील पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली, तानाजी चौगुले यांच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पुढील वाटचालीसाठी युवाशक्ती एक्सप्रेस , शिवांश न्युज, युनिटी मीडिया प्रेस क्लब चे अध्यक्ष सौ. अध्यक्षा सौ.रुबीना मुल्ला व पदाधिकारी यांच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा