प्रतिनिधी:
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योजना यांना नियमबाह्य पदोन्नती देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर नियमबाह्य पदोन्नतीमुळे सदर पदावर बसण्यास लायक असलेल्या डॉक्टरवर प्रशासनाने अन्याय केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुका आरोग्य अधिकारी म्हणून ज्या डॉ. योजना यांना पदभार दिलेला आहे त्या सदर पदाकरीता पात्र नाहीत, असे निदर्शनास आले असून वास्तविक ज्येष्ठतेनुसार डॉ. श्रीमती अलमास जी खान यांची आरोग्य अधिकारी म्हणून वर्णी लागणे इष्ट असताना अलमास खान यांना डावलून डॉ. योजना यांना आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त करणे बेकायदा आहे. आणि अलमास खान यांच्यावर अन्याय झालेला आहे. जे चुकीचे आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये. त्यामुळे डॉ. अलमास खान यांच्या ऐवजी डॉ. योजना यांची तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करून डॉ. अलमास खान यांच्यावर केलेल्या अन्यायाबाबत सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी.

कोरोना सेंटरमधून रुग्ण पळून गेल्या प्रकरणी चौकशी व्हावी….
जी. जी. कॉलेज येथील कोरोना रुग्णालयातून ६२ वर्षीय कोरोना रुग्ण धनसिंग थापा हा पळून गेला. सदर रुग्णाचा मृतदेह निर्मळ येथे सापडला. कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून जातोच कसा? प्रशासन काय करते ? यापूर्वी वरुण कोविड सेंटर मधून रुग्ण पळून गेला होता. सदर प्रकरणी प्रशासनाने संपूर्ण चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *