

दि.१२, वाडा वार्ताहर -मनोज बुंधे.
वाडा तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील शाळा व महाविद्यालये सर्व परिस्थिती सुरळीत होईपर्यंत सुरू करू नयेत याबाबत गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालय वाडा व गटशिक्षण अधिकारी वाडा यांना निवेदन देण्यात आले.
सध्या लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणली असून सद्यस्थितीत वाडा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.महाराष्ट्र राज्य शासन शाळा व महाविद्यालये सुरू करण्याच्या विचारात आहेत.अशावेळी वाडा तालुक्यातील शाळा महाविद्यालये सुरू केली तर ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होवून त्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण झपाट्याने वाढून त्यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो,या बाबीचा विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याची काळजी हेतूने सद्यस्थितीत तालुक्यातील कोणतीही शाळा व महाविद्यालये सुरू करू नये अशी विनंती तहसीलदार कार्यालय वाडा आणि गटशिक्षण अधिकारी वाडा यांना संघटनेच्या वतीने दिल्या गेलेल्या निवेदनात करण्यात आली.
शासन नियमांचे पालन करून हे निवेदन देण्यात आले असून,निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष भीमराव बागुल,दिलीप कुमावत,वाडा तालुका उपाध्यक्ष सुजय जाधव, रुग्ण मित्र किरण थोरात उपस्थित होते.