
आज मंगळवार दि. ४ आॅक्टोबर २०२२ रोजी संत गोन्सालो गार्सिया अनाथाश्रम,वसई येथे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.श्री. मुझफ्फर घन्सार यांनी बालगोपाळांच्या सोबत अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसानिमित्त लहान मुलांना खाऊ व जेवण वितरीत करण्यात आले.
मुलांनी गीत गाऊन मुझफ्फर घन्सार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस श्री.तसनीफ नूर शेख, उपाध्यक्ष श्री. झीया शेख, सचिव सौ. शाहीदा खान व श्री. अशफाक शेख, युवा मोर्चा जिल्हा सचीव श्री.प्रतिक चौधरी, भाजपा जिल्हा सचिव श्री. कीरण पाटील, वसई शहर मंडळ सरचिटणीस श्री. अमित पवार, मंडळ युवा सरचिटणीस श्री. संकल्प राऊत हे उपस्थित होते.



