नालासोपारा :- टोलनाक्याच्या परिसरात ६२ कि.मी.च्या अंतरात कुठल्याही कारणास्तव वाहनचालकांना मदत करण्याची जबाबदारी टोलचालकाची असते. यासाठी १०३३ ही हेल्पलाइन आहे. यावर संपर्क साधल्यानंतर तातडीने मदत मिळते. याकरिता ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. मात्र त्यावर अवलंबून राहता येणार नाही असेच दिसते. अत्यावश्यक वेळेला या हेल्पलाइनला संपर्क साधल्यास ही प्रक्रियाच वेळखाऊपणाची असल्याचे दिसून येते.

हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास संबंधित आपल्या समस्या जाणून घेतात. त्यानंतर माहितीसाठी ते कॉल पुढे इतर प्रतिनिधीकडे वळते करतात. या सर्व प्रक्रियेत भरपूर वेळ निघून जातो. त्यामुळे अडचणीत असलेला मनुष्य हेल्पलाइनवर कॉल करत बसेल की इतर पर्याय शोधत बसेल, हा प्रश्न उद्भवत आहे.

टोलपासून ६२ कि.मी.च्या अंतरात मिळेल मदत

२ टोलपासून ६२ कि.मी.च्या अंतरात मिळेल मदत टोल परिसरात ६२ किमी अंतरावर मदत करण्याची जबाबदारी टोल प्रशासनाची असली तरी या टोलनाक्यावर कोणाचाच वचक नसल्याने त्याचा कारभार रामभरोसे सुरु असतो. हेल्पलाइन क्रमांक देखील केवळ नावालाच असल्याचे दिसून येतात.

१०३३ वर काय मिळते मदत

जखमी झाल्यास किंवा लागल्यास फर्स्ट एडची मदत मिळते.
मोठा अपघात झाल्यास रुग्णवाहिका मिळते.
सुरक्षेशी संबंधित प्रकरणात पेट्रोलिंग वाहन दिले जाते.
वाहन बिघडल्यास, गाडी पंक्चर आणि पेट्रोल संपल्यास सुरक्षा देणे. वाहन बिघडल्यास टो करून गॅरेज पर्यंत पोहोचवून देण्याची मदत मिळते

अडचण अल्यास वाहन चालकांनी काय करावे ?

अडचण आल्यास वाहन चालकांनी टोल मार्गावर असलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तेथे मदत न मिळाल्यास स्थानिक पोलिस ठाणे अथवा स्थानिकांची मदत मागावी.

वसईत एकच टोल

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसईत एकमेव खानिवडे टोल नाका आहे. हा टोल येथील कर्मचायांच्या दादागिरीसाठीच प्रसिद्ध आहे. टोल घेण्याशिवाय कोणत्याही सुविधा याठिकाणी नाहीत. रात्री या मार्गावर अंधार असतो. अवजड वाहने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. मात्र सोयी-सुविधा शून्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *