

नायगाव (प्रतिनिधी) दिनांक 20 में रोजी पत्रकार तेहसीन चिंचोळकर यांनी समाजसेविका कर्मवीर स्नेहाताई जावळे यांच्या राहत्या घरी भेट घेण्यात आली . स्नेहाताईने तेहसीन याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भविष्याच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी स्नेहा फाऊंडेशनच्या वतीने महिलांचे प्रश्न उपस्थित केले .
- सामान्य पत्रकारांना कसलेही आरक्षण व सुविधा का नाही ?
- आता ज्या गरिब महिलांचे पती कोरोनामुळे वारले त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार काही मदत करणार का ?
- सरकारी कोट्यतुन मिळालेले राशन गरिबांना कधी मिळणार ?
- खुप गोर गरिबांच्या नौकऱ्या गेल्यात त्यांच्या भविष्यांची तरतुद काय ?
येणारे काळात हे सर्व येणारे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न व महिला सशक्तीकरण व सरकार कडून योजनांचे लाभ व प्रबोधन करणे काळाची गरज आहे असे असंख्य विषयावर त्यांनी चर्चा केली .
तेहसीन चिंचोळकर यांनी वाढदिवसा निमित्त काही वाॅशेबल फेस मास्क गरिबांना वाटप करण्यासाठी दिले. गरिबांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेवुन अशा पद्धतीने साजरा केलेला वाढदिवस आजच्या स्त्रीचे बदलेले सक्षम रुप तर दर्शवते त्यासोबतच सक्षम स्त्री समाजा प्रती जागृक असुन जबाबदार नागरिक असल्याचे प्रमाण मिळते .
मी खुप भाग्यवान आहे की माझी संपुर्ण टिम खुप संवेदिनशिल व समाजसेवे प्रती जागृक आहे ; असे स्नेहा जावळे म्हणाल्या .