दि. 19 ते 20 मे रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,जिल्ह्यातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा पाहाणी दौरा.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार तोक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊसही झाला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडलीत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे आणि छप्परही उडाले.चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा तोक्ते चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला 10 लाखची तात्काळ मदत देण्याची यावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या तोक्ते चक्रीवादळाने तडाखा दिलेल्या तसेच कोकणातील वादळीवाऱ्या पाऊसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना उद्या दि 19 ते 20 मे रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,जिल्ह्यातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पाहाणी दौरा करणार आहेत.

यावेळी ना रामदास आठवले म्हणाले की महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही याचा परिणाम जाणवणार आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यायासह जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या. चक्रीवादळामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.अशा नुकसान झालेल्या गावांची तलाठी, तहसिलदार यांच्या मार्फत तात्काळ पंचनामे करण्याची मागणीही ना रामदास आठवले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *