

वसई (प्रतिनिधी) . गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टी भागात तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातले असून पालघर जिल्ह्यात हाहाकार उडवला आहे. वसई तालुक्यात वादळा मूळे तीन जणांचा मृत्यू , ३४ घरे व १३ सरकारी इमारतीचे नुकसान झाल्याचे कळते. या वादळामुळे नालासोपारा पेल्हार येथील तीन वर्षीय मुलगा सिद्धार्थ सिंग, भोयदा पाडा येथील चौथ्या मजल्याच्या बांधकामाची विट कोसळून अल्लब प्रसाद यादव या ४१ वर्षीय मजुराचा तसेच पेल्हार जाबरपाडा येथे रिक्षा वर झाड कोसळून मोहम्मद मसुरी वय वर्ष ५१ अश्या तीन जणांचा मृत्यू झाला असून रिचर्ड कंपाउंड येथे भिंत अंगावर पडून ७ जण जखमी झाले आहेत .
या चक्रीवादळा मुळे वसई-विरार येथील बागायतदारांची उत्पादन देणारी केळी, आंबा, जांभूळ, फुलेंउत्पादन करणारी झाडे उद्वस्थ झाली असून सुमारे ३०० हुन अधिक झाडे भुईसपाट झाली आहेत. पालघर जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पाण्याखाली गेले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात पावसामुळे विटभट्टी उत्पादकांचा विटांचा कच्चा माल भट्टीत जाण्याअगोदरच भिजून गेला त्यामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पालघर जिल्हात टेंबी येथील मच्छिमारी नौका बुडाली असून अर्नाळा येथील मच्छिमार बोटींचे देखील नुकसान झाले आहे.
पालघर जिल्यातील वसई तालुक्यातील शेतकरी , बागायतदार, वीटभट्टी मालक, मच्छिमार यांना झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
शेतकरी आगोदरच कोरोनाच्या संकटावर सामना देत असताना त्यानां अस्मानी संकटाला सामोरे जावे लागले आहे. व त्यांच्या डोळ्यादेखत झालेले नुकसान बघण्याशिवाय गत्यांतर राहिले नाही.
यामुळे वसई विरार जिल्हा युवक अध्यक्ष कुलदीप दिनेश वर्तक यांनी मा. ना . श्री विजय वडेट्टीवार मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य , जिल्हाअधिकारी पालघर , वसई उपविभागीय अधिकारी , तहसीलदार वसई यांना निवेदन देउन त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली आहे.


