
दिनांक 17, 18 आणि 19 मे रोजी आलेल्या महाभयंकर तौक्ते वादळाने संपूर्ण वसईचे जनजीवन विस्कळीत केले होते. या वादळामुळे वसईतील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि अनेक मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान झालेले होते. या नुकसानग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करणे आवश्यक आहे. परंतु 20 दिवस उलटूनही बऱ्याच ठिकाणचे पंचनामे अजून झालेलेच नाहीत.
तरी तातडीने सदरचे पंचनामे आपण पूर्ण करून घ्यावेत. ज्याद्वारे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित राहता कामा नये.अशी मागणी वसई तहसीलदार कडे समीर वर्तक यांनी केली
