वसई(प्रतिनिधी)-वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली नुकतीच घडली आहे.कृणाल गुप्ता असे या दुदैवी मुलाचे नाव आहे.तो आपल्या आईवडीलांसोबत पापडी बुद्धवाडी येथे वास्थवास होता.दरम्यान शिवसेनेचे वसई
प्रमुख प्रथमेश राऊत यांनी कृणाल गुप्ताच्या मृत्यूस पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.या दुर्देवी घटनेनंतर शनिवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलाच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. खासदार राजेंद्र गावित, विनायक निकम,नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले विजय पाटील हे यावेळी उपस्थित होते.
दी.१४ सप्टेंबर रोजी कुणाल गुप्ता हा १२ वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसह पापडी तलावाशेजारी खेळता खेळता तलावात गणपती विसर्जनासाठी आणलेल्या पालिकेच्या ताराफ्यावरून पाय घसरून पडल्याने तलावात बुडून मृत्यू झाला होता.सदर घटनेमुळे या तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणपती विसर्जन होऊन २ दिवस उलटूनही तो तराफा का हटविला नाही?असा सवाल वसई शहर प्रमुख प्रथमेश राऊत यांनी उपस्थित केला आहे.विशेष म्हणजे ३ वर्षांपूर्वीही या तलावात दीपक जयस्वाल या लहानग्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. असे असतानाही पालिकेने सदर बाब गांभीर्याने घेतली नव्हती. त्यातच संतापजनक बाब म्हणजे कृणाल गुप्ता या मुलांच्या मृत्यू नंतर सुद्धा पालिका अधिकारी फिरकले नाहीत, त्यामुळे पालिका अधिकारी तलावाच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते.दरम्यान दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून
या तलावाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेणावेत तसेच ४ प्रवेशद्वारा पैकी २ प्रवेशद्वार बंद ठेवावेत अशी मागणी पालिकेच्या आयुक्तांकडे प्रथमेश राऊत यांनी केली आहे.तसेच तलावात मृत्यू पावलेल्या कुणाल गुप्ता या मुलाच्या कुटूंबियांना पालिकेने नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य करावे व दुर्घटनेस जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे-

वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ कार्यक्षेत्रातील वार्ड क्र.१०९ मध्ये पालिकेने पापडी तलावाचे सुशोभीकरण केले आहे. सदर तलाव रस्त्यालगत असून या तलावा च्या सुशोभीकरणा साठी पालिकेने करोडो रुपये खर्च केले आहेत.पण या तलावासाठी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था न केल्याने याठिकाणी कधीही दुर्घटना घडू शकते.या तलावाचा ठेका मुकेश ब्रदर्स या ठेकेदाराला देण्यात आला आहे.परंतु संबंधित ठेकेदाराने सदरचे काम अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार न करता बांधकामाकरीता रेतीऐवजी ग्रीटपावडरचा केला.सदर बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेने दी.३१/३/३०१५ रोजी तसेच दी.२९/२/२०१६ रोजी संबंधित ठेकेदारास नोटीस बजावून सदरचे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार रेती वापरण्याची तंबी दिली होती.शिवाय
पालिकेच्या पथकाने दी.१७/२/२०१६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर तलावाच्या बांधकामात त्रुटी असल्याच्या निदर्शनास आले होते. परंतु ठेकेदाराने पालिकेच्या नोटीसांना केराची टोपली दाखवून आपल्या कार्यपद्धतीत कोणतीच सुधारणा केली नसल्याचे समोर येत आहे.त्यातच या तलावाच्या सुशोभीकरणासाठी
ठेकेदाराने रेतीऐवजी ग्रीटपावडरचा वापर केल्याने या तलावाचे सुशोभीकरण वादात सापडले होते.ठेकेदारांने रेतीऐवजी ग्रीटपावडरचा वापर केल्याने ठेकेदार मुकेश ब्रदर्सला चक्क दोन वेळा नोटीस देऊन ताकीद दिली होती. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने संबंधित ठेकेदारांने आपल्या कार्यपद्धतीत कोणताच बदल केला नाही. परिणामी या तलावाच्या सुशोभीकरणा साठी साडेचार करोड रुपये खर्च करूनही आजही या तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *