वसई(प्रतिनिधी)-वसई पश्चिमेकडील सनसिटी येथे अडीच एकर जमनीवरील प्रस्थावित सर्वधर्मीय दफनभूमीच्या मुद्द्यावर
मी वसई अभियानाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.वसई विरार पालिकेने या कामासाठी आजपर्यंत ११ करोड रुपये खर्च केले आहेत.
नियमबाह्य पध्दतीने अशा प्रकारे करदात्यांच्या पैसांच्या अपव्यय करणाऱ्या वसई विरार पालिकेच्या कारभारा विरोधात कालपासून
मी वसईकर अभियानाचे धरणे आंदोलनास सुरवात केली.मौजे दिवानमान सर्वे नं १७६,१७७ या जागेवर वसई विरार पालिकेने सर्वधर्मीय दफनभूमी बांधण्यासाठी मे.जे.आर.कन्स्ट्रक्शन या कंपनीला चार कोटी तेरा लाख सतरा पंधरा रूपयेचा ठेका दिला होता.हा ठेका देताना नियमांचे कुठलेही पालन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले नाही.संबंधित ठेकेदाराला परवान्याची मुदत संपलेली असताना सुद्धा त्या ठेकेदाराच्या व्यक्तिगत हितासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून ,बनावट कागदपत्रांच्या आधारावर ठेका देण्यात आल्याचा आरोप वसईकर अभियानाने
केला आहे.तसेच सदर जागेवर ३३५९७ ब्रास मातीचा भराव केल्याने चार कोटी पंच्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार आठशे रुपये दंड महसूल विभागाने बजावला होता. अशा रीतीने या कामांसाठी पालिकेने ११ करोड रुपये खर्च केले होते.धक्कादायक बाब म्हणजे ज्या जागेवर दफनभूमी बांधायची होती ती जागा महापालिकेची नसून सीआरझेड मध्ये मोडत असल्याचे समोर आले होते .त्यातच महापालिकेने सीआरझेडचे नाहरकत प्रमाणपत्र सुध्दा घेतले नाही.शिवाय कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता दफनभूमीचे कार्यादेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले. सदर घोटाळा मनपा अधिकारी,नगरसेवक व ठेकेदार या सर्वांनी संगनमताने करून जनतेची फसवणूक केली आहे.अशा प्रकारे दफनभूमी
बांधण्यासाठी जनतेच्या ११ करोड रुपयाचा अपव्यवहार करण्यात आला आला आहे.त्या अनुषंगाने संबंधितांवर जनतेच्या पैशाचा अपव्यवहार,फसवणूक व भ्रष्टाचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित रक्कम वसूल करण्याची मागणी मी वसईकर अभियान’ तर्फे करण्यात आली आहे.
दिवनमान वसई येथे सर्वधर्मीय स्मशानभूमी बांधताना ती जागा सीआरझेड
मध्ये येते,याची स्पष्ट कल्पना महापालिकेतील सबंधितांना होती.महत्त्वाचे म्हणजे पालिकेकडे नगर रचना विभाग कार्यरत आहे.पण सीआरझेड बाबत योग्य परवानगी न घेतल्याने
हरित लवादाच्या आदेशाने तीदफनभूमी महापालिकेला तोडावी लागली.अशा प्रकारे महापालिकेचे हे काम वादग्रस्त व बेकायदेशीर ठरले होते.सर्वधर्मीय विशेषतः काही समाजबांधवांसाठी ती स्मशानभूमी असणे अत्यंत आवश्यक होत.असे जरी असले तरी आज ती तोडावी लागल्याने ती भिंत बांधण्यावर खर्च पैसे केलेले वसईकर करदात्यांचे होते.ते पैसे जनतेच्या कष्टाचे असल्याने ते वसूल होणे आवश्यक आहे.त्यामुळे त्या भिंतीच्या बांधकामाला मंजुरी देणारे संबंधित नगरसेवक,सल्ला देणारे नगररचना विभागाचे संबंधित अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी यांच्यावर निष्काळजी पणा, संगनमत, जनतेच्या पैशाच्या अपव्ययास जबाबदार, भ्रष्ट्राचार केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माननीय उच्च न्यायालयाचे वकील अशोकजी वर्मा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक , माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्याकडे केली होती. परंतु ते संबंधित मागणीची दखल घ्यावयास तयार नसल्याचे दिसून येथे. त्यामुळे एकप्रकारे एफ. आय. आर दाखल करणे बाबत सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशांची ते पायमल्ली वा अवमानना होत आहे.सदर प्रकारच्या निषेधार्थ स्वतः आदरणीय ऍड. अशोक वर्माजी व मी वसईकर अभियानाचे कार्यकर्ते यांनी आजपासून अप्पर पोलीस अधिक्षक ,वसई यांचे कार्यालया समोर
दोन दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलनास सुरुवात केली असून दफनभूमी घोटाळ्यातील सर्व संबंधित दोषींवर एफ.आय.आर दाखल न झाल्यास जनजागृती करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *