
पालघर प्रतिनिधी : दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मौजे अंबोडे तालुका पालघर येथील त्रिरत्न बुद्धविहारास भेट देऊन विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत महाकारुणी बुद्ध यांना अभिवादन करून विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत ,पालघर जिल्हा अध्यक्ष जगदीश राऊत, पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष बिंबेश जाधव , पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अरशद खान , पालघर जिल्हा महासचिव व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष कांबळे ,पालघर जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी ,पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत , पालघर जिल्हा महिला अध्यक्षा मोहिनी जाधव ,जिल्हा उपाध्यक्षा विद्याताई मोरे , स्नेहा जाधव , आशा गवई , पालघर जिल्हा महासचिव सुमती कांबळे , जिल्हा प्रमुख सल्लागार दिवाकर जाधव, पालघर तालुका उपाध्यक्ष अमर कोरी, पालघर तालुका सहसचिव योगेश राऊत, बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे , सफाळा शहर उपाध्यक्ष विजय कांबळे, सफाळा शहर उपकार्याध्यक्ष सतिष शिवगण, सफाळा विभाग कार्यकारणी विकास मोरे, सफाळे विभाग सचिव अनुप कांबळे, सफाळा शहर महिलाध्यक्षा नेत्रा कांबळे, पारगाव शाखा कार्याध्यक्ष मनिष भोईर, सफाळा विभाग कार्यकारणी प्रशांत जाधव, प्रविन जाधव, प्रकाश माने, सफाळा विभाग कार्यकारणी सदाशिव मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.