

प्रतिनिधी : दलित पँथरचे जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात विस्तार व प्रभावात वाढ होत असून,परिणामी अनेक कार्यकर्ते पँथर मध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. त्या अनुषंगाने दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉल,जव्हार येथे जव्हार ,मोखाडा तालुका कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली. क्रियाशील,सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी देण्यात येऊन, नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. सदर सभेत जव्हार तालुका अध्यक्ष पदी लक्ष्मण गोविंद ,उपाध्यक्ष रामदास गोविंद, शिडा पढेर, कार्याध्यक्ष बाबू सुनाड, उपकार्याध्यक्ष मोहन भोरे, महासचिव कृष्णा दखणे,सचिव महेंद्र दुधेडा, सहसचिव उमेश जंगली,तालुका सदस्य सकऱ्या दुधेडा, दिनकर रांनडा, वसंत किनर या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच मोखाडा तालुका अध्यक्ष पदी पुन्हा ईश्वर धोंडगा यांची नियुक्ती करण्यात येऊन,उपाध्यक्ष कमळू जंगली, कार्याध्यक्ष बिलट धोंडगा, उपकार्याध्यक्ष देविदास बेंडकोळी, महासचिव कल्पेश लोखंडे, सचिव पांडुरंग लहारे, जव्हार तालुका का. सदस्य रामदास पढेर, जयराम पढेर, मोखाडा शहर अध्यक्ष इरफान शेख या पद्धधिकारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी पालघर जिल्हा उपाध्यक्ष अरशद खान, जिल्हा उपाध्यक्ष भावेश दिवेकर,लहानु डोबा ,जिल्हा सचिव संतोष कांबळे, पालघर तालुका उपाध्यक्षअहमद खान, उपकार्याध्यक्ष जितेंद्र कुर्ले व कार्यकर्ते उपस्थित होते