

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटकातील दहावी परीक्षेला आज गुरुवारपासून सुरवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील दहावी परीक्षा केंद्रांवर ,शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी बेळगावातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग वाढू लागली. यावेळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे एनयुजेएमतर्फे गुलाब पुष्प देऊन स्वागत तसेच परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
टिळकवाडी येथील बालिका आदर्श शाळेच्या प्रवेशद्वारावर एनयुजेएम बेळगाव तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पत्रकार श्रीकांत काकतीकर, उपेंद्र बाजीकर, मिलिंद देसाई, विश्वनाथ येळ्ळूरकर, महादेव पवार, हिरालाल चव्हाण, उमेश गंगधर, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक एन ओ डोनकरी, विज्ञान विकास शाळेचे मुख्याध्यापक सुरेश किल्लेकर, एकनाथ पाटील, विश्वास गावडे यांच्यासह इतर उपस्थित होते.