मागील अनेक वर्षांपासून दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील सर्वधर्मीय दफनभूमीचे काम रखडले आहे. त्यामुळे नवघर-माणिकपूर परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाऱ्या अल्पसंख्याक व लिंगायत समाजाची फार परवड होत आहे. गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी शिष्टमंडळासह महानगरपालिका आयुक्त श्री अनिलकुमार पवार यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. या सर्वधर्मीय दफणभूमीचे सर्व प्रशासकीय काम पूर्ण झाले असून मंगळवारी वर्कऑर्डर मिळून लगेच काम चालू करण्याच्या सूचना माननीय आयुक्तांनी दिलेल्या आहेत.
वसई तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाला हक्काच्या दफनभूमी/कब्रस्तानसाठी जागा मिळावा म्हणून श्री समीर सुभाष वर्तक यांनी दिनांक 1 जुलै ते 3 जुलै 2013 साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून “आमरण उपोषण” केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बसिन तालुका मुस्लिम कब्रस्तान कमिटी मागील 33 वर्षांपासून प्रयत्नशील असून सामाजिक कार्यकर्ते आणि KGN सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री कल्लन खान यांनीही आमरण उपोषण व साखळी उपोषण करून या सर्वधर्मीय दफनभूमीसाठी भरपूर मेहनत व पाठपुरावा केलेला आहे. सर्वांच्या मेहनतीने या सर्वधर्मीय दफनभूमीचे काम मार्गी लागत आहे.
आज मा. आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळात श्री समीर सुभाष वर्तक यांच्यासोबत बसिन तालुका कब्रस्तान कमिटीचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते श्री फारूक मुल्ला, KGN सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री कल्लन खान, राष्ट्रीय फेरीवाला महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते श्री मॅकेन्झी डाबरे, काँग्रेसच्या वसई विरार जिल्ह्याचे सोशल मीडिया श्री मन्सूर आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ जयश्री भोईर या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *