आपला इतिहास आपला अभिमान आहे त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे हेच ध्येय लक्षात घेवून गेली अनेक महिने प्लास्टिक मुक्त गडकिल्ले यावर दुर्ग रक्षक फोर्स आयोजित अनेक संस्था, पुरातत्व विभाग, रायगड विकास प्राधिकरण व इतर दुर्ग प्रेमी यांनी हे मुख्य कार्य हाती घेतले आहे.
गडकिल्ले स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे हे भान प्रत्येक शिव भक्तांनी गडावर गेल्यावर लक्षात ठेवायला असे मत दुर्ग रक्षक फोर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे यांनी सर्वांना दिला. गड किल्याची जाणीव व जनजागृती व्हावी यासाठी एक सेवा मोहीम श्री शंभू छत्रपती यांच्या राजाभिषेक सोहळ्या निम्मित सलग 3 दिवस आयोजित करण्यात आली होती. त्यात पूर्ण रायगड परिसर व कडेकापरी रोप लावून ९०० बॅग प्लास्टिक कचरा काढण्यात आला.
यात इतिहास अभ्यासक रायगड जिल्ह्यातील किल्ले या अभ्यासू पुस्तकाचे लेखक राणे सर यांनी मार्गदर्शन करून प्रारंभ करून दिला.
या मोहिमेत दुर्ग रक्षक फोर्स परिवाराचे प्रसार विभाग प्रमुख श्री राज पोतदार, विशेष महिला संघटक वैष्णवी पोतदार, संपर्क प्रमुख जानवी एडवनकर , सातारा विभाग प्रमुख यश खंदारे, सुमित बहिरमकर,बाल दुर्ग सेविका त्रिशा मोहिते,श्री अतिश मोहिते, पुनम मोहिते-पुणे विभाग, योगेश गायकवाड- कोकण विभाग, भूमी गायकवाड,दुर्ग प्रचारक व रक्षक अक्षय वेलस्कर, शिवगंध प्रतिष्ठान महिला मुख्य संघटक दुर्ग सेविका रुपाली हिंगे, गौरव कदम, योगेश कदम, सुशांत चोपडे, प्रशांत गायकवाड, श्रीकांत गायकवाड, अजय भोसले, अमृता काशीद, प्रवीण नलावडे, रामदास बिरसदर, धनंजय रेटवडे, श्री प्रवीण खैरनार, ऋषिकेश दीक्षे, नवनीत नवले,दिनेश माने, मारुती जाणकार, प्रदीप मगदूम, आकाश वरखडे, प्राणीमित्र यश बोंद्रे, प्राणीमित्र सूरज होले , अक्षय आदमने, कुणाल अडोळे,सुनील शेटके, विकेष सिसोदिया, अक्षयकुमार मादर व इतर
संस्था दुर्ग प्रेमी यांनी या मोहिमेत सहभाग घेवून आपले कर्तव्य बजावताना दिसून आले.
प्लास्टिक मुक्त गडकिल्ले पुढील मोहिमेत सहभागी होण्यासाठी ७७६७८७६५६२ या नंबर वर संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *