
मुंबई :10 दिवसाच्या पाहुणचारानंतर गणपती बापाना निरोप देण्यात आला. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक गणपती बापाचं विसर्जन करण्यात आले. मात्र विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याच साम्राज्य पाहावयास मिळाले . त्यातमध्ये कचरा, अर्धवट विसर्जन झालेल्या बपांच्या मुर्त्या तसेच विघटण न झालेला कचरा. मोठया प्रमाणात किनाऱ्यावर आलेला पाहावयास मिळाला. त्यासाठी समुद्र किनारे साफ राहावेत आणि समुद्रतील जल्चर प्राण्यांना कोणती हानी होऊ नये म्हणून दुर्ग रक्षक फोर्स या संस्थेने 11 सप्टेंबर 2022 रोजी स्वच्छता मोहीम राबवून मुंबई गिरगांव चौपाटी परिसर साफ करून किनाऱ्यावरील प्लास्टिक जमा करून शेकडो शिवभक्तांनी आपली जबाबदारी पार पाडली. या संस्थेच्या मुंबई विभागाचे व मोहिमेचे प्रमुख दुर्ग रक्षक स्वप्नाली वारंगे यांनी प्लास्टिक मुक्तचा संदेश देवून प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या न वापरता शाडूच्या मातीच्या मुर्त्या वापरण्याचा संदेश या मोहिमेतून साऱ्यांना दिला.
या मोहिमेत टीम माणिकगड संवर्धन , टीम कोहोज,टीम दातेगड अनेक दुर्ग संवर्धन संस्था सहभागी होत्या. या सर्व मोहिमेचे आयोजन करुन संस्थेचे संस्थापक जयकांत शिक्रे यांनी ही माहिती दिली.

