
आयुक्तांना दोषी धरणार: डी. एन. खरे
नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरिता प्रत्येक वर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून करोडो रुपयांचे टेंडर पाणी शुद्ध करण्याकरिता काढल्या जातात. करोड रुपये खर्च करुन सुद्धा ठेकेदार अशुद्ध पाणीपुरवठा करतोच कसा? ठेकेदार आणि महापालिकेतील अभियंते व अधिकारी यांच्या संगणमताने पाणी शुद्धीकरणाचा करोडो रुपयाचा निधी गिळंकृत केल्या जात असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टी कडून केल्या जात आहे. पाणीपुरवठा विभागा कडून कातकरीपाडा, कोपरी, शिरगाव, चंदसार व महापालिका क्षेत्रातील सर्वच ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा गेली चार दिवस पासून नागरिकांना पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. त्यातच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. सदरचे दूषित पाणी प्राशन केल्यास हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते किंबहुना हजारो लोकांचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो. तरी महापालिका प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन तात्काळ पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा बहुजन समाज पार्टी कडून महापालिका प्रशासनाला धारेवर धरण्यात येईल तसेच सदर दूषित पाणी पिणे कुणाच्या जिवावर बेतल्यास थेट महापालिका आयुक्त श्री. अनिलकुमार पवार यांना दोषी धरण्यात येईल त्याची महापालिका प्रशासनाने नोंद घ्यावी. असा इशारा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी दिला आहे.